फोटो सौजन्य: @carandbike(X.com)
भारतीय ऑटो बाजारात टू व्हीलर सेगमेंटमध्ये बाईकची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आजही अनेक बजेट फ्रेंडली बाईक्सना चांगली प्रतिसाद मिळताना दिसतो. पण ग्राहकांमध्ये असाही एक वर्गात आहे, जो उत्तम लूक असणाऱ्या बाईक्सना प्राधान्य देतात.
भारतात उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या आणि दमदार लूक असणाऱ्या बाईक मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्या जातात. या बाईक्सना विशेषकरून तरुणांमध्ये चांगली डिमांड मिळते. नुकतेच नवीन रॉयल एन्फिल्ड हंटर 350 मार्केटमध्ये लाँच झाली आहे. लाँच झाल्यानंतर या बाईकमध्ये पहिल्यांदाच एक मोठा अपडेट देण्यात आला आहे. हंटर 350 ला आणखी आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने काही आवश्यक बदल देखील केले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे.
2025 मध्ये Maruti Suzuki ‘या’ 2 SUVs आणायच्या तयारीत, ‘असा’ असेल कंपनीचा मास्टर प्लॅन
2025 च्या रॉयल एनफील्ड हंटर 350 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे मागील सस्पेंशन. याला आता लिनियर स्प्रिंगपासून प्रोग्रेसिव्ह स्प्रिंगमध्ये बदलले आहे. एक्झॉस्टसाठी नवीन राउटिंगसह, ग्राउंड क्लिअरन्स 10 मिमीने वाढविण्यात आला आहे. यात नवीन डिझाइन केलेली सीट देखील आहे, ज्याची प्रोफाइल पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकच्या सर्व व्हेरियंटमध्ये स्लिप-असिस्ट क्लचची सुविधा दिली आहे. याशिवाय, ते इतर अनेक उत्तम फीचर्ससह अपडेट केले गेले आहे.
2025 रॉयल एनफील्ड हंटर 350 आता एलईडी हेडलॅम्प, ट्रिपर पॉडसह डिजी-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये टाइप-सी चार्जरसह येते. आता ही बाईक 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात पूर्वीसारखेच 349 सीसी एअर-कूल्ड जे-सिरीज मोटर इंजिन मिळेल, जे 20.2 एचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन त्याच स्लिक-शिफ्टिंग 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे आता स्लिप-असिस्ट क्लचसह जोडलेले आहे.
मार्केटमध्ये बोलबाला असणाऱ्या Mercedes ने थांबवले ‘या’ लोकप्रिय कारचे उत्पादन
नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या बेस व्हेरियंटची किंमत पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.50 लाख रुपये, मिड-स्पेक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.77 लाख रुपये आणि टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.82 लाख रुपये आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 5,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सध्या, भारतीय बाजारात, रॉयल एनफील्ड हंटर 350 होंडा CB350 RS आणि Jawa 42 सारख्या बाईक्सशी स्पर्धा करते.