फोटो सौजन्य: @autocar (X.com)
जगभरात मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली कारसोबतच लक्झरी कार्सची देखील क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी, उद्योगपती आणि उच्च वर्गीय लोकांच्या ताफ्यात आपल्याला अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स लक्झरी कार पाहायला मिळतात. त्यातही लक्झरी कार्सची स्पीड वेगवान असल्यामुळे अनेक जणांना या कार्सबद्दल आकर्षण असते.
जगात अनेक लक्झरी आणि हाय परफॉर्मन्स ऑफर करणाऱ्या कंपन्या आहेत. Ferrari ही त्यातीलच एक आघाडीची कार कंपनी आहे. नुकतेच या कंपनीने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या ग्रँड टूरर रोमाच्या जागी नवीन Ferrari Amalfi जागतिक स्तरावर सादर केली आहे. कंपनीने मागील मॉडेलपेक्षा या कारला अधिक पॉवरफुल आणि चांगल्या एरोडायनॅमिकसह आणले आहे. ती रोमासारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जबरदस्त ऑफर! यामाहाच्या स्कूटर RayZR 125 Fi हायब्रिडवर १० वर्षांच्या वॉरंटीसह १०,००० रुपयांची सूट
Ferrari Amalfi मध्ये 3.9-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन वापरले गेले आहे. हे इंजिन आणखी पॉवरफुल बनवण्यासाठी ते री-ट्यून केले गेले आहे. हे इंजिन 640hp पॉवर आणि 760Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याच्या इंजिनला पूर्वीपेक्षा चांगले परफॉर्मन्स देण्यासाठी, एक हलका कॅमशाफ्ट आणि एक नवीन ECU (इंजिन कंट्रोल युनिट) बसवण्यात आला आहे. या बदलांमुळे, ही कार फक्त 3.3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवते. त्याच वेळी, 0 ते 200 किलोमीटर प्रति तास वेग वाढविण्यासाठी फक्त 9 सेकंद लागतात. त्याचा टॉप स्पीड ताशी 320 किलोमीटर आहे.
फेरारीचा दावा आहे की खिडक्या वगळता प्रत्येक बॉडी पॅनल अगदी नवीन ठेवण्यात आली आहे. कारच्या पुढच्या भागात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याचा फ्रंट लूक Purosangue एसयूव्हीसारखाच आहे. पातळ हेडलॅम्प काळ्या पट्टीने जोडलेले आहेत जे त्याला मॉडर्न टच देते.
या कारमध्ये नवीन अंडरबॉडी लिप्स आणि पुन्हा डिझाइन केलेले ॲक्टिव्ह विंग आहेत. साइड प्रोफाइल बहुतेक पूर्वीसारखेच आहे. त्यात फ्लश-फिटिंग डोअर हँडल आणि 20-इंच व्हील्स दिले गेले आहेत.
कारच्या केबिनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यात गियर सिलेक्टर, की स्लॉट आणि वायरलेस चार्जिंग पॅड आहे. 8.4-इंचाच्या व्हर्टिकल टचस्क्रीनची जागा मोठ्या 10.25-इंचाच्या लँडस्केप टचस्क्रीनने घेतली आहे, जी वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते. त्यात फिजिकल बटणे परत आणण्यात आली आहेत. यामुळे कार चालवताना त्यांचा वापर करणे सोपे होईल. रोमाप्रमाणे, अमाल्फीमध्येही मागे दोन सीट आहेत. अमाल्फीची कन्व्हर्टिबल (ड्रॉप-टॉप) व्हर्जन लाँच होईपर्यंत, फेरारी रोमा स्पायडरची विक्री सुरू ठेवेल.