फोटो सौैजन्य: @Mahindra_Thar (X.com)
भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होत असते. याच वाढत्या मागणीमुळे, अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. मात्र, आजही दमदार एसयूव्ही ऑफर करण्यात महिंद्रा कंपनी अग्रस्थानी आहे. 2024 मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर देखील ऑफर केल्या होत्या, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यात आता कंपनीची Mahindra Thar ROXX ही Dolby Atmos असणारी जगातील पहिली एसयूव्ही ठरली आहे.
Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
भारतातील लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक असलेल्या Mahindra Thar ROXX ला नवीन फीचर्ससह अपडेट करण्यात आले आहे. त्याचा AX7L व्हेरियंट डॉल्बी अॅटमॉससह अपडेट करण्यात आला आहे. यानंतर, 4-चॅनेल इमर्सिव्ह ऑडिओ सिस्टमसह डॉल्बी अॅटमॉस वापरणारी ही जगातील पहिली एसयूव्ही बनली आहे. यामुळे लोकांचा प्रवास पूर्वीपेक्षा चांगला होईल. Thar ROXX मध्ये डॉल्बी अॅटम्स जोडल्यानंतर ड्रायव्हिंग पूर्वीपेक्षा कसे चांगले होईल त्याबद्दल जाणून घेऊया?
Mahindra Thar ROXX त्याच्या मजबूत बिल्ड आणि ऑफ-रोडिंगसाठी ओळखले जाते, परंतु आता ही एसयूव्ही संगीत प्रेमींसाठी देखील पहिली पहिली पसंत ठरणार आहे. त्यात डॉल्बी अॅटमॉस जोडल्यानंतर, कारमधील संगीताचा अनुभव तुम्ही कॉन्सर्ट हॉलमध्ये बसल्यासारखा होईल. यात असलेले 9-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम तुमचा प्रत्येक प्रवास खूपच संस्मरणीय बनवेल. यामध्ये दिलेल्या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये गाणी स्ट्रीमिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही कधीही डॉल्बी अॅटमॉसच्या साउंड क्वालिटीमध्ये तुमची आवडती गाणी ऐकू शकता.
हम भी है इस रेस में ! Renault कडून Electric Car लाँच करण्याची तयारी, मिळाली ‘ही’ माहिती
हे एक असे तंत्रज्ञान आहे जे संगीत, चित्रपट आणि गेमिंगला पूर्णपणे नवीन अनुभव देते. डॉल्बी अॅटमॉस तुमच्या प्रत्येक बीटला सभोवताली आणते आणि एक उत्तम अनुभव देते.
महिंद्रा ऑटो आणि डॉल्बी अॅटमॉस यांनी पार्टनरशिप केली आहे. याबद्दल Dolby Laboratories चे सिनिअर डिरेक्टर (IMEA) करण ग्रोव्हर म्हणाले की, आम्ही या पार्टनरशिपबद्दल खूप उत्सुक आहोत. थार ROXX AX7L मध्ये डॉल्बी अॅटमॉससह, आम्ही ड्रायव्हिंगला एका नवीन स्तरावर घेऊन जात आहोत. ही कार तुमच्या केबिनला पेर्सोनालाइज्ड कॉन्सर्ट हॉलमध्ये रूपांतरित करते, जी थार ROXX च्या साहसी भावनेला आणखी सुधारते. महिंद्रा आणि डॉल्बीने एकत्रितपणे इन-केबिन टेक्नॉलजीत एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांची रायडींग अजूनच उत्तम ठरणार आहे.