फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत झपाट्याने होणारी वाढ. तसेच भारतीय ग्राहक सुद्धा या नवीन EV ला भरघोस प्रतिसाद देत आहे. यामुळेच, तर अनेक कंपन्या ज्या आधी इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत्या. त्याच आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे.
देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या उत्तम इलेक्ट्रिक कार ऑफर करतात. पण यातही जेव्हा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारचा विषय येतो, तेव्हा आपसूकच MG Comet EV चे नाव डोळ्यांसमोर येते.
एमजी मोटर इंडियाने त्यांच्या पोर्टफोलिओमधील सर्व मॉडेल्सवर डिस्काउंट जाहीर केले आहेत. कंपनीच्या एंट्री लेव्हल पोर्टफोलिओ आणि देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक फोर-व्हीलर Comet EV वरही मोठी सूट मिळत आहे.
जर तुम्ही या महिन्यात MG Comet EV इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर तुम्हाला 45 हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. ही कार चार व्हेरियंटमध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, एक्साईट, एक्सक्लुझिव्ह आणि 100-इयर एडिशन यांचा समावेश आहे. कंपनीने जानेवारीमध्ये आपल्या किमतींमध्येही बदल केले आहेत. पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 230 किमीची रेंज देते.
या कारची रचना व्हर्लिंग एअर ईव्ही सारखीच आहे. कॉमेट ईव्हीची लांबी 2974 मिमी, रुंदी 1505 मिमी आणि उंची 1640 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2010 मिमी आहे. या कारचा टर्निंग रेडियस फक्त 4.2 मीटर आहे, जो वर्दळीच्या रस्त्यांवर कार चालवण्यासाठी किंवा अरुंद जागांमध्ये पार्किंग करण्यासाठी उपयुक्त आहे. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये बंद फ्रंट ग्रिल, पूर्ण-रुंदीची एलईडी स्ट्रिप, आकर्षक हेडलॅम्प आहे. यात मोठे दरवाजे, स्पोर्टी अलॉय व्हील्स आणि फ्लॅट रिअर सेक्शन आहे.
यात 10.25 इंचाची स्क्रीन, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल क्लस्टर आहे. वापरकर्ते विविध फीचर्समध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या डिव्हाइसेसना जोडण्यास सक्षम असतील. हे म्युझिक, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, हवामान माहिती आणि रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्सची माहिती प्रदान करेल. एमजी कॉमेट ईव्ही बे (ब्लू), सेरेनिटी (ग्रीन), सनडाऊनर (ऑरेंज) आणि फ्लेक्स (लाल) या चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.
एमजी कॉमेट ईव्ही जीएसईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. शहरी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार डिझाइन केली आहे. परंतु, ही कार तिच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे थोडी नाजूक दिसू शकते. पण यात 12-इंच चाके आहेत आणि टायरचा आकार 145/70 आहे. तुम्हाला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक मिळतात तर मागच्या बाजूला ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत.
डिस्क्लेमर: आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने कारवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटचा उल्लेख केला आहे. ही सूट तुमच्या शहरात किंवा डीलरमध्ये कमी-अधिक असू शकते.