Mahindra Thar ROXX 2.0 Petrol
सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेली ही थार रॉक्स पेट्रोल व्हेरियंट एक दमदार 5-डोअर SUV आहे. 2.0 लिटर mStallion टर्बो-पेट्रोल इंजिनच्या बरोबर उत्कृष्ट पॉवर आणि ड्रायविंगचा उत्तम अनुभव देते. मॅन्युअल ट्रान्समिशनवर 163 bhp, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 177 bhp पॉवर ही थार देते. 330 Nm मॅन्युअल टॉर्क तर 380 Nm ऑटोमॅटिक टॉर्कच्या बरोबर, हे पेट्रोल व्हेरियंट प्रामुख्याने रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) पर्यायासह येते. इंजिनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंट्सप्रमाणे या थारची किंमत १२ लाखापासून ते 20 लाखपर्यंत जाते. Mahindra Thar ROXX 2.0 Petrol या थारला 6 airbags , ADAS लेव्हल-2, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), आणि 360-डिग्री कॅमेरा इनबिल्ड आहे. चांगल्या व्हेंटिलेशन बरोबर ड्युअल-स्क्रीन डिस्प्ले, आणि पॅनोरमिक सनरूफ, 5 दरवाजे आणि 7 रंगांचे पर्याय या थारला मिळतात.
Mahindra Thar Roxx एका तासात किती पेट्रोल-डिझल खर्च करू शकते, विकत घेण्या अगोदर जाणून घेणे महत्वाचे
Mahindra Thar 2.2 Diesel 4×4
सप्टेंबर 2024 मध्ये अपडेटेड स्वरूपात उपलब्ध असलेली ही थार 2.2 डिझेल 4×4 व्हेरियंट ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी खास तयार करण्यात आली आहे. 2.2 लिटर mHawk डिझेल इंजिनसह ही SUV दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट टॉर्क प्रदान करते. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 152 bhp पॉवर आणि 330 Nm टॉर्क मिळतो, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 175 bhp पॉवर आणि 370 Nm टॉर्क निर्माण करते. 4×4 ड्राइव्हट्रेनमुळे खडतर रस्ते, चिखल आणि डोंगराळ भागांमध्येही ही थार सहजपणे चालते. व्हेरियंटनुसार या थारची किंमत सुमारे 15 लाखांपासून 23 लाख रुपयांपर्यंत जाते. Mahindra Thar 2.2 Diesel 4×4 मध्ये 6 एयरबॅग्स, ADAS लेव्हल-2, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल डिसेंट कंट्रोल, आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय ड्युअल-स्क्रीन डिस्प्ले, वायरलेस कनेक्टिव्हिटी, पॅनोरमिक सनरूफ, 5 दरवाजांची सुविधा आणि आकर्षक रंग पर्याय या SUV ला अधिक प्रीमियम बनवतात.
नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह Mahindra Thar facelift लाँच, किती असेल किंमत?
Mahindra Thar 1.5 Diesel RWD
महिंद्राची ही Thar 1.5 Diesel RWD व्हेरियंट शहरातील आणि लांबच्या प्रवासासाठी किफायतशीर पर्याय म्हणून ओळखली जाते. 1.5 लिटर mHawk डिझेल इंजिनसह ही SUV 117 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध असून, स्मूथ ड्रायव्हिंग आणि चांगल्या मायलेजचा अनुभव देते. रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) सेटअपमुळे ही थार दैनंदिन वापरासाठी तसेच हायवे ड्राइव्हसाठी उपयुक्त ठरते. व्हेरियंटनुसार या थारची किंमत सुमारे 11 लाखांपासून 14 लाख रुपयांपर्यंत जाते. Mahindra Thar 1.5 Diesel RWD मध्ये ड्युअल फ्रंट एयरबॅग्स, ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रोल-केज सेफ्टी यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, रूफ-माउंटेड स्पीकर्स, आकर्षक इंटिरियर आणि अनेक रंग पर्यायांमुळे ही थार तरुण ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे






