कारगाड्यांची आणि वाहनांची आवड तर लोकांना जुन्या काळापासूनच आहे; मग त्यात प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार वेगवेगळ्या कार त्यांना पसंत पडतात. एखाद्या जनरेशन मध्ये जसं सगळ्यांच्या आवडी बहुतेक सारख्याच असतात, आणि त्यामुळे त्यांच्या पसंतीही बहुतेक सारख्याच असतात. असंच काहीसं या पिढीबरोबरही झालंय.
थार कारचा लुक
2010 मध्ये लाँच झालेल्या महिंद्रा कंपनीच्या थार गाडीने तरुण पिढीचं लक्ष लगेच वेधून घेतलं. क्लासिक जीपच्या पुढची पिढी बनवत बनवत महिंद्राने तरुणांना एक ऑफ-रोडिंग’ एसयूव्ही दिली. अगदी तरुणांच्या स्वभावाला शोभेल अशी, डोंगर द्दर्यात, कड्या कपारीत उत्साहाने आणि न थकता फिरेल अशी ही महिंद्राची थार एक ट्रेंड बनत गेलीय. जीप सदृश लुक, रंगांमध्येही अगदी कमी आणि क्लासि रंग, बॉडीमध्ये एक भव्यपणा, कुठल्याही खडतर प्रवासात आरामात चालणारी अशा या तिच्या विशेष गोष्टींमुळे थार ही कार तरुणांच्या लक्ष वेधण्याच कारण बनत आहे.
मागच्या काही वर्षात थारच्या नवीन मॉडेल्सनी तर अजून प्रसिद्धी मिळवली आहे. थार म्हणजे रुतबा आणि रावडी लुक, या तयार झालेल्या ट्रेंडमुळे थारची अजून जास्त प्रसिद्धी झाली आहे.
Mahindra Thar Roxx घेणाऱ्यांचा विश्वास कैक पटीने वाढला, Bharat NCAP मध्ये मिळाली 5 स्टार रेटींग
थार कारचा इतिहास
राजस्थाथान मधील ‘थार’ वाळवंटाच्या नावावरून बोलावल्या जाणाऱ्या या महिंद्राच्या कारला एका बाजूला तरुण पिढीने उचलून धरले आहे. तरी, काही जणांच्या मते थार ही कार लोक रुतबा आणि अहंकार दाखवण्यासाठी सुद्धा घेतायत. लोकांची मतं वेगवेगळी तर आहेच, पण या थारचा इतिहास तर काही वेगळीच बाजू मांडून गेला आहे.
दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत
महिंद्रा थारचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाशी आणि अमेरिकन ‘विलीज’ जीपशी जोडला गेलेला आहे. 1940 च्या दशकात, दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन लष्करासाठी एक हलकी, मजबूत आणि सर्व प्रकारच्या खडतर रस्त्यांवर धावू शकेल अशी गाडी तयार करण्यात आली होती. युद्धाच्या दृष्टीने बनवण्यात आलेली, ही थारसदृश जीपची पहिली आवृत्ती होती. युद्ध संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या या गाड्या महिंद्राने भारतात आणल्या आणि 1949 मध्ये विलीज जीपचे सुटे भाग भारतात जोडून निर्मिती सुरू केली. महिंद्राने अनेक दशके क्लासिक जीप मॉडेल बनवल्यानंतर, पूर्णपणे भारतीयांच्या आवडीनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानासह 2010 मध्ये अधिकृतपणे महिंद्रा थार लाँच केली.






