फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट आणि त्यातीलच व्यापाराच्या संधी नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. म्हणूनच देशात अनेक विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. रेनॉल्ट ही त्यातीलच एक कंपनी. आता लवकरच कंपनी 7-seater Renault Duster लाँच होणार आहे.
लवकरच रेनॉल्ट इंडिया भारतीय बाजारात त्यांची नवीन एसयूव्ही डस्टरचा मोठा व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे, जी Boreal नावाने सादर केली जाऊ शकते. ही एसयूव्ही आधीच ग्लोबल मार्केटमध्ये Dacia Bigster या नावाने उपलब्ध आहे. आता तिचा युरो एनसीएपी क्रॅश टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.
अहवालानुसार, क्रॅश टेस्टमध्ये डेसिया बिगस्टरला 3-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यापूर्वी, डेसिया डस्टरलाही हेच रेटिंग देण्यात आले होते. ही माहिती काही लोकांसाठी समाधानकारक असली तरी, काही खरेदीदारांना ही एसयूव्ही खरेदी करणे हा शहाणपणाचा निर्णय असेल की नाही, हा प्रश्न नक्कीच मनात राहणार.
लय वाईट ! ‘या’ कंपनीच्या विक्रीला उतरती कळा, अनुभवली 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने Dacia Bigster मध्ये अनेक महत्त्वाचे फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, सीटबेल्ट प्रीटेन्शनर आणि लोड लिमिटर, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरेज, फ्रंट पॅसेंजर एअरबॅग कट-ऑफ स्विच आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी मूलभूत सेफ्टी फीचर्स आहेत. यासोबतच, त्यात प्रगत सेफ्टी सिस्टम प्रदान करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) सिस्टम समाविष्ट आहे, जी कार-टू-कार, बाईकर्स आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम करते, स्पीड असिस्टन्स सिस्टम, लेन असिस्ट सिस्टम सारखे फीचर्स आहेत.
अॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या इव्हॅल्युएशनमध्ये डासिया बिगस्टरने 27.7 गुण म्हणजेच 69% गुण मिळवले आहेत. फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये, पॅसेंजर कंपार्टमेंट स्थिर असल्याचे आढळून आले. या टेस्टिंगमध्ये चालकाच्या छातीचे संरक्षण कमकुवत असल्याचे वर्णन केले आहे. पूर्ण-रुंदीच्या बॅरियर टेस्टिंगमध्ये छातीच्या संरक्षणाला किरकोळ रेटिंग देण्यात आले, तर साइड बॅरियर आणि पोल इम्पॅक्ट टेस्टमध्ये शरीराच्या सर्व प्रमुख भागांना चांगले संरक्षण प्रदान केले.
बिगस्टरने बाल रहिवासी सुरक्षा विभागात 42 गुण म्हणजेच 85% गुण मिळवले आहेत. मुलाच्या शरीराच्या सर्व महत्वाच्या अवयवांना फ्रंटल ऑफसेट आणि साइड बॅरियर टेस्टमध्ये संरक्षित करण्यात आले. पुढच्या प्रवासी सीटवर एअरबॅग डिसएबल पर्याय देण्यात आला आहे, ज्यामुळे मागील बाजूस असलेल्या मुलांच्या सीटचा सुरक्षितपणे वापर करणे शक्य होते. परंतु, त्यात चाइल्ड प्रेझेन्स डिटेक्शन सिस्टीम नाही, जी एक कमतरता मानली जाऊ शकते.