फोटो सौजन्य - Social Media
येझदी आणि बीएसए यांनी त्यांच्या नव्या स्क्रॅम्बलर मोटरसायकलींचे मुंबईत रिटेल लाँचिंग केले असून या बाइक्स आता अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील रस्ते, लांब पल्ल्याचे हायवे तसेच खडतर मार्गांवर सहज धावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या बाइक्स साहसी रायडर्ससाठी आकर्षण ठरत आहेत.
भारतातील सर्वात हलकी 350 सीसी स्क्रॅम्बलर म्हणून ओळखली जाणारी *येझदी स्क्रॅम्बलर 350* दैनंदिन वापर आणि वीकेंड ट्रिप्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. नव्या लिक्विड-कूल्ड ‘कटार’ इंजिनमुळे या बाइकमध्ये दमदार परफॉर्मन्स, चांगला टॉर्क-टू-वेट रेशो आणि जलद प्रतिसाद मिळतो. या बाइकची सुरुवातीची किंमत 1,99,950 रुपये ठेवण्यात आली आहे.
दुसरीकडे *बीएसए स्क्रॅम्बलर 650* ही भारतातील या सेगमेंटमधील एकमेव 650 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन असलेली मोटरसायकल आहे. दमदार लो आणि मिड-रेंज टॉर्कसह ब्रिटिश स्क्रॅम्बलर स्टाइलिंगचा संगम या बाइकमध्ये पाहायला मिळतो. बीएसएच्या गोल्ड स्टार कॅटालिना, ए10 स्पिटफायर आणि ए65 फायरबर्ड यांसारख्या ऐतिहासिक मॉडेल्सपासून प्रेरित असलेल्या या बाइकची सुरुवातीची किंमत 3,24,950 रुपये आहे.
क्लासिक लेजेंड्सचे सहसंस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितले की, स्क्रॅम्बलर बाइक्समध्ये मोटरसायकलिंग क्षेत्रातील ‘एसयूव्ही’ बनण्याची क्षमता आहे. शहरातील राइडिंगपासून ऑफ-रोड अनुभवांपर्यंत विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या बाइक्स विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईतील रायडर्सना नव्या मार्गांचा शोध घेण्यासाठी या बाइक्स प्रेरित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्राहकांना आता मुंबईतील अधिकृत डीलरशिपमध्ये या दोन्ही बाइक्सचा अनुभव घेता येणार आहे. सर्व डीलरशिपमध्ये विक्री, सर्व्हिस आणि आफ्टरसेल्स सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय कंपनीच्या कस्टमर अश्युरन्स प्रोग्रामअंतर्गत 4 वर्षे किंवा 50,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी, 6 वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी, एक वर्षाची रोडसाइड असिस्टन्स सेवा आणि देशभरातील 400 हून अधिक सेल्स व सर्व्हिस टचपॉइंट्सवर सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या नव्या लाँचिंगमुळे भारतीय स्क्रॅम्बलर सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक वाढण्याची शक्यता असून साहसी मोटरसायकलप्रेमींना दोन नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.






