दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला युवक, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.