फोटो सौजन्य: @MotorBeam (X.com)
भारतीय बाजारात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. हाच हाय परफॉर्मन्स आपल्याला रॉयल एन्फिल्डच्या बाईक्समध्ये पाहायला मिळतो. रॉयल एन्फिल्डने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत, ज्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. कंपनीच्या विक्रीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण आता कंपनीच्या एका बाईकमधे बिघाड झाला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये बाईक विकणाऱ्या रॉयल एनफील्डच्या एका बाईकमध्ये बिघाड आढळून आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाईकमधील बिघाडाबद्दल माहिती मिळाल्यानंतर, कंपनीने बुकिंग आणि विक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जास्त रेंज आणि फीचर्ससह लाँच झाली JSW MG Windsor Pro, जाणून घ्या किंमत
Royal Enfield Scram 440 बाईकमध्ये खराबी आल्याची तक्रार आल्यानंतर त्याचे बुकिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Royal Enfield Scram 440 बाईकच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा लोकांनी सांगितले की ही बाईक बंद केल्यानंतर ती सुरूच होत नव्हती. ही समस्या मॅग्नेटोमधील वुड्रफ कीमुळे उद्भवू शकते आणि ती फक्त काही मोजक्या युनिट्सवरच परिणाम करू शकते.
रॉयल एनफील्ड ही समस्या असलेल्या सर्व बाईक मोफत दुरुस्त करणार आहे. बाईक दुरुस्त करण्यासाठी सुमारे एक ते दोन तास लागू शकतात. यासाठी, कंपनी ही बाईक खरेदी केलेल्या सर्व लोकांना फोन, मेसेज आणि ई-मेलद्वारे माहिती देईल. याशिवाय, त्यांना बाईकमधील समस्येबद्दल माहिती दिली जात आहे आणि त्यांना बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्यास सांगितले जात आहे.
रॉयल एनफील्डने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की स्क्रॅम 440 ची डिलिव्हरी उशिराने होत आहे. आमची टीम परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच डिलिव्हरी पुन्हा सुरू करण्याची आशा आहे. बाईकमधील बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर, कंपनीने बाईकची बुकिंग आणि विक्री तात्पुरती थांबवली आहे.
कमालच आहे ! ‘या’ व्यक्तीने ‘ही’ EV 5.8 लाख किलोमीटर चालवत केली 18.2 लाख रुपयांची बचत
स्क्रॅम 440 मध्ये रॉयल एनफील्डचे 440 सीसी एलएस इंजिन आहे. जे शहरातील ड्रायव्हिंगसाठी तसेच ऑफ-रोडिंगसाठी खूप चांगले काम करते. त्यासोबत सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
स्क्रॅम 440 ची किंमत 2.08 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.85 लाख रुपये आहे. ही बाईक बाजारात, Triumph Speed, Scrambler 440, Harley Davidson 440X, Hero Maverick 440 सारख्या बाइक्सशी थेट चॅलेंज करते.