फोटो सौजन्य: @Hyundai_Global (X.com)
जगभरात इलेक्ट्रिक कार्सना दमदार मागणी मिळताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे त्रस्त झालेले ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीतजास्त पाठींबा दर्शवत आहेत. पण यातच एका व्यक्तीने अशी काही कामगिरी करून दाखवली आहे, ज्यामुळे नक्की EV खरेदी करणे का फायद्याचे आहे, हे अधोरेखित झाले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Hyundai Ioniq 5 आता केवळ तिच्या स्टाइल आणि रेंजसाठीच नाही तर तिच्या बॅटरीसाठी देखील ओळखली जाणार आहे. दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या ली यंग-ह्युम नावाच्या व्यक्तीने त्यांची इलेक्ट्रिक कार तब्बल 5.8 लाख किलोमीटर चालवली आहे. हे एवढे अंतर तर टॅक्सी देखील पार करत नाही. विशेष म्हणजे या प्रवासानंतरही कारची बॅटरी 87.7% निरोगी असल्याचे आढळून आले आहे.
Jeep Wrangler चा Willys 41 Edition भारतात लाँच, किमंत वाचाल तर चक्रवाल
जेव्हा जेव्हा ईव्हीबद्दल चर्चा होते तेव्हा पहिला प्रश्न पडतो की- बॅटरी किती काळ टिकेल? पण लीच्या अनुभवानंतर ती भीतीही संपली आहे.
ली यंग-ह्युम हा व्यवसायाने सेल्समन आहे आणि ते दररोज सरासरी 586 किलोमीटर प्रवास करत होते. त्यांनी 5.80 लाख किमीचा हा प्रवास अंदाजे 2 वर्षे आणि 9 महिन्यांत पूर्ण केला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतके लांब अंतर पार केल्यानंतरही त्याला कारच्या बॅटरी, मोटर किंवा इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये कोणतीही समस्या आढळली नाही.
फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीचे जलद नुकसान होते असे अनेकदा म्हटले जाते, परंतु लीच्या अनुभवाने हे चुकीचे आहे असे सिद्ध केले आहे. त्यांनी कारची बहुतेक चार्जिंग फास्ट चार्जिंग स्टेशनवरून केले आणि तरीही बॅटरीचा परफॉर्मन्स चांगला होता.
किती पण नवीन कार येऊ द्यात ! ‘या’ 5 SUVs शिवाय ग्राहकांना दुसरे काही दिसतच नाही
जेव्हा ह्युंदाई-कियाच्या रिसर्च टीमला या कारबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी कोणत्याही चार्जशिवाय संशोधनासाठी कारची बॅटरी आणि मोटर बदलली. टेस्टिंग दरम्यान, असे आढळून आले की 5.80 लाख किमी अंतर पार केल्यानंतरही बॅटरीची स्थिती 87.7% वर राहिली. हा आकडा विशेष आहे कारण सहसा असा मायलेज फक्त टॅक्सी किंवा कमर्शियल वाहनांमध्येच दिसून येतो.
जर लीच्या जागी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने Hyundai Tucson सारख्या पेट्रोल कारमध्ये हेच अंतर कापले असते तर त्याला पेट्रोलवर सुमारे 48.56 लाख रुपये खर्च करावे लागले असते. तर, Ioniq 5 सह हा प्रवास फक्त 30.36 लाख रुपयांमध्ये पूर्ण झाला. म्हणजे तब्बल 18.2 लाख रुपयांची थेट बचत झाली. ईव्हीमध्ये फक्त इंधनच नाही तर मेंटेनन्सचा खर्चही अत्यंत कमी असतो. पेट्रोल कारमध्ये, या अंतरादरम्यान, तेल 66 वेळा, ब्रेक फ्लुइड 13 वेळा, स्पार्क प्लग 8 वेळा आणि ट्रान्समिशन ऑइल 11 वेळा बदलावे लागेल. आयोनिक 5 मध्ये याची गरज नव्हती. फक्त जनरल सर्व्हिस आणि काही कन्ज्युमेबल्स बदलण्यात आल्या. याचा अर्थ सुमारे 7 लाख रुपयांची अतिरिक्त बचत देखील झाली.