Skoda Kushaq चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Skoda. स्कोडाने भारतीय ग्राहकाच्या मागणीनुसार चांगल्या कार्स ऑफर केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Skoda Kushaq ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली होती.
स्कोडा भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार विकते. Skoda Kushaq ही कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून विक्रीसाठी सादर केली आहे. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला किती EMI भरावा लागेल?
कुशाकचा बेस व्हेरिएंट क्लासिक आहे, ज्याची किंमत 10.61 लाख रुपये आहे. जर हे वाहन दिल्लीमध्ये खरेदी केले तर आरटीओसाठी सुमारे 1.12 लाख रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 55 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, फास्टॅग आणि टीसीएस शुल्क म्हणून 11,111 रुपये देखील द्यावे लागतील. त्यानंतर स्कोडा कुशाक क्लासिकची ऑन-रोड किंमत सुमारे 12.39 लाख रुपये होईल.
Tata Motors ला लागली दिवाळीची लॉटरी! ऑक्टोबर 2025 विक्रीचा आकडा पाहून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट Classic खरेदी करत असाल, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स दिला जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर बँकेकडून सुमारे 10.39 लाख रुपये फायनान्स घ्यावे लागतील. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज देते, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा सुमारे 16,726 रुपयांइतका ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 12.39 लाख रुपये इतका कार लोन घेतलात, तर दरमहा 16,726 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही Skoda Kushaq च्या Classic बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 3.65 लाख इतके व्याज भराल. त्यामुळे कारची एकूण किंमत अंदाजे 16.04 लाख रुपये होईल.
जगभरात Made In India कारचा डंका! ‘या’ कंपनीने थेट 12 लाख गाड्या केल्या निर्यात
Skoda कडून Kushaq ही एक कॉम्पॅक्ट साइझ SUV म्हणून सादर करण्यात आली आहे. बाजारात या कारचा थेट मुकाबला Maruti Brezza, Tata Nexon, Hyundai Venue, Volkswagen Taigun, Kia Seltos, Kia Sonet आणि Mahindra XUV 3XO अशा लोकप्रिय SUV मॉडेल्ससोबत होत आहे.






