फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारतात दुचाकी बाजारपेठेत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. अशातच यामहाने मागील आठवड्यात 10 जूनला आपल्या ‘फसिनो’चे नवे ‘एस’ वर्जन लॉंच केले आहे. या सेगमेंटमधील स्पर्धकांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
हा नवीन प्रकार पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक नवनवीन वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आली आहेत. कंपनीने ‘फसिनो एस’ तीन वेगवेळ्या रंगामध्ये लॉंच केले आहे. प्रत्येक रंगाच्या गाडीची किंमत वेगवेगळी असणार आहे.
गाडीचे हटके फिचर्स
अनेकवेळा आपल्याला स्कूटर गर्दीच्या ठिकाणी पार्क करावी लागते. त्यामुळे स्कूटर शोधण्यात खूप त्रास सहन करावा लागतो. यासाठी यामहाने ग्राहकांना स्कूटरमध्ये ‘आंसर बॅक’ हे फिचर दिले आहे. या फिचरच्या मदतीने ग्राहक त्यांची स्कूटर कुठूनही शोधू शकतात. हे फिचर वापरण्यासाठी यामहाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल. जे गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. जेव्हा वापरकर्ता आन्सर बॅक बटण क्लिक करले तेव्हा या स्कूटरचे दोन्ही इंडिकेटर ब्लिंक होतील आणि दोन सेकंदानंतर हॉर्न देखील वाजेल. याशिवाय, आता नवीन फसिनो एसमध्ये नॉर्मल आणि ट्रॅफिक मोडसह सायलेंट स्टार्टर, ऑटोमॅटिक स्टार्ट आणि स्टॉप फंक्शन यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील.
गाडीची पॉवर
यावर्षी लॉंच करण्यात आलेल्या फसिनो एसमध्ये 125cc क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. जे 8.04bhp पॉवर आणि 10.3Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये 5.2 लीटरची इंधन टाकी असून तिचे एकूण वजन 99 किलो आहे. स्कूटरचे पुढच्या बाजूस 12 इंच अलॉय व्हील आणि मागील बाजूस 10 इंच अलॉय व्हील आहे. याशिवाय समोर टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. तसेच या स्कूटरच्या समोरच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन आहे.
रंग आणि किंमत
यामहाने फसिनो एस तीन वेगवेगळ्या कलरमध्ये लॉंच केली आहे. यामध्ये त्यांनी मॅट रेड, मॅट ब्लॅक आणि मॅट ब्लू हे रंग उपलब्ध आहेत. किंमतींबद्दल बोलायचे झाले तर, मॅट रेड आणि मॅट ब्लॅक रंगाची फसिनो एस 125 ची किंमत 93,730 रुपये आहे, तर फसिनो एस 125 मॅट ब्लू कलरची किंमत 94,530 रुपये आहे. (एक्स शोरूम किंमत). अशी ही नवीन लॉंच झालेली ‘यामहाने फसिनो एस’ गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.