आज भारतातील शहरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत रिक्षा हे सर्वसामान्य वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले आहे. कमी खर्च, अरुंद रस्त्यांवर सहज चालण्याची क्षमता आणि प्रवाशांना घराजवळ पोहोचवण्याची सोय यामुळे रिक्षाने भारतीयांच्या दैनंदिन जीवनात विशेष स्थान मिळवले आहे.
रिक्षाचा उगम 1869 मध्ये जपानमध्ये झाला. जपानी संशोधक इझुमी योसुके, सुझुकी टोकुजिरो आणि ताकायामा कोसुके यांनी मानवी शक्तीवर चालणारी दोन चाकांची “जिनरिक्शा” विकसित केली. “जिनरिक्शा” या शब्दाचा अर्थ “मानवी शक्तीवर चालणारे वाहन” असा होतो. कमी खर्चात आणि घोडागाडीपेक्षा सोपा पर्याय उपलब्ध करून देणे हा या शोधामागील मुख्य उद्देश होता.
गुंतवणूक कमी नफा जास्त; ‘या’ आहेत टॉप बेस्ट इलेकट्रीक रिक्षा
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रिक्षा आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचली. भारतात सुरुवातीला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा कोलकाता परिसरात दिसू लागल्या. नंतर 1940-50 च्या दशकात सायकल रिक्षांचा प्रसार झाला. वाढती लोकसंख्या आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन 1950 च्या दशकात मोटारचालित ऑटो रिक्षा विकसित करण्यात आल्या.
भारतातील रिक्षा उद्योगाच्या वाढीत स्थानिक उत्पादक कंपन्यांचे मोठे योगदान आहे. कमी इंधन खर्च, सोपी देखभाल आणि परवडणारे भाडे यामुळे ऑटो रिक्षा लवकरच लोकप्रिय झाली. आज लाखो चालकांसाठी रिक्षा हा रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. अगदी दळणवळणापासून ते जीवनवाहिनीचे ही कार्य रिक्षाकडून पार पडले जातेय.
एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत …
काळानुसार रिक्षामध्येही बदल झाले. पेट्रोल आणि डिझेल रिक्षांनंतर आता सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आल्या आहेत. पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जातो.
एका साध्या मानवी-शक्तीच्या वाहनापासून सुरू झालेला रिक्षाचा प्रवास आज भारताच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. ही केवळ वाहनाची नव्हे, तर नवकल्पना, रोजगार आणि लोकसेवेची यशोगाथा आहे.






