आपल्या भारतात तीन चाकी वाहनंही तेवढीच लोकप्रिय आहेत जेवढी दुचाकी आणि चारचाकी. आणि इतकच नव्हे तर दैनंदिन वाहतुकीचा मोठा भाग ही तीन चाकी वाहने उचलतात. कमी खर्च, चांगलं मायलेज आणि अगदी छोट्या गल्ल्यांमधून, छोट्या रस्त्यांमधून सहज चालण्याची क्षमता असल्यामुळे ही तीन चाकी वाहने शहरांपासून अगदी गावखेड्यांपासून सगळीकडे लोकप्रिय आहेत. रिक्षा, टुक-टुक, तीन चाकी स्कूटर, छोटा हत्ती सारखी मालवाहू वाहने अशा विविध प्रकारांमध्ये ती उपलब्ध आहेत.
१. सायकल रिक्षा
तीनचाकी वाहनांच्या लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे नाव घ्याया पाहिजे ते म्हणजे सायकल रिक्षा. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही सायकल रिक्षा कार्यरत आहे ते आजपर्यंत. टांग्याच्या नंतर या सायकल रिक्षानेच लोकांना दळणवळणासाठी सहाय्य केले. अजूनही दिल्ली, आग्र्याच्या परिसरात या सायकल रिक्षा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
२.ऑटो रिक्षा
भारतातले सर्वात प्रसिद्ध तीन चाकी वाहन म्हणजे ऑटो रिक्षा. शहरांमध्ये लाखो लोक दररोज प्रवासासाठी याचा वापर करतात. आकाराने चार चाकी गाड्यांपेक्षा लहान असल्याने आरामात ट्राफिक मधून रस्ता काढत, छोट्या रस्त्यांमधून या रिक्षा जाऊ शकतात. पेट्रोल,सीएनजी, एलपीजी बरोबरच इलेक्ट्रिक प्रकारांतही रिक्षा उपलब्ध आहेत.
डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल …
3.टुक-टुक
टुक-टुक हे मुळात ऑटोरिक्षाचेच लोकप्रिय नाव आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतात वापरली जाणारी, रिक्षापेक्षा दिसायला थोडी वेगळी असणारी ही टुक-टुक, पर्यटनस्थळांवर आणि लहान शहरांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर दिसते. परदेशातही भारतीय टुक-टुक ची मोठी ओळख आहे.
४.छोटा हत्ती
छोटा हत्ती हे तीन चाकी वाहन भारतात मालवाहतुकीसाठी एवढे प्रसिद्ध झाले आहे कि त्याचे मूळ नाव लोक जवळजवळ विसरूनच गेले आहेत. Tata Ace हे त्याचे मूळ नाव. किरण, फळभाज्या, बांधकाम साहित्य आणि इतर छोट्या मोठ्या वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी यावहानाचा अगदी दैनंदिन मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
5.मालवाहू तीन चाकी वाहन
शहरांतील लास्ट-माईल डिलिव्हरीसाठी कार्गो रिक्षा उपयुक्त ठरतात. कमी खर्चात जास्त माल वाहून नेण्याची क्षमता ही त्यांची खासियत आहे.
1 किलो CNG वर Auto Rickshaw किती किमी चालते? – Navarashtra
६. ई-रिक्षा
बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा पर्यावरणपूरक मानल्या जातात. कमी प्रदूषण आणि कमी खर्चामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. त्याच्याच बरोबर ऑनलाइन शॉपिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय वाढल्याने इलेक्ट्रिक मालवाहू तीन चाकी वाहनांची म्हणजे इलेक्ट्रिक कार्गो थ्री-व्हीलर यांचीही मागणी वाढत आहे. ही वाहने कमी खर्चिक आणि पर्यावरणस्नेही आहेत, हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
आज भारतातील तीन चाकी वाहने केवळ प्रवासाची साधन राहिली नाहीत, तर लाखो लोकांच्या रोजगाराचा आधार बनली आहेत. इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे या क्षेत्राचे भविष्य अधिक उज्ज्वल मानले जात आहे.






