फोटो सौजन्य: @odmag (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. यातही लक्झरी कार सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन कार्स लाँच होत आहे. भारतात जरी मोठ्या प्रमाणात बजेट फ्रेंडली कार्सची विक्री होत असली तरी लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. म्हणूनच तर अनेक लक्झरी ऑटो कंपन्या नवनवीन कार मार्केटमध्ये ऑफर करत असतात. नुकतेच मार्केटमध्ये नवीन Range Rover Evoque Autobiography लाँच झाली आहे.
भारतात, टाटा मोटर्सच्या मालकीची कंपनी रेंज रोव्हर विक्रीसाठी अनेक वाहने ऑफर करते. कंपनीने अलीकडेच त्यांची एक एसयूव्ही अपडेट केली आहे. त्यानंतर, Range Rover Evoque Autobiography मध्ये कोणत्या प्रकारचे इंजिन ऑप्शन दिले आहेत. ही कार कोणत्या किमतीत खरेदी करता येणार आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक ग्राहकांच्या मनातून काही केल्या उतरेना, विक्रीत पटकावला टॉपचा नंबर
रेंज रोव्हरने भारतात नवीन इव्होक ऑटोबायोग्राफी एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये हायब्रिड तंत्रज्ञान दोन इंजिन पर्यायांसह देण्यात आले आहे. यात P250 माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. जे 184 किलोवॅटची पॉवर आणि 365 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. दुसऱ्या इंजिन पर्याय म्हणून, त्यात D200 माइल्ड हायब्रिड इंजिन आहे जे 150 किलोवॅटची पॉवर आणि 430 न्यूटन मीटरचा टॉर्क देते.
या नवीन एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये स्लाइडिंग पॅनोरॅमिक रूफ, पिक्सेल एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, 19 इंच अलॉय व्हील्स, हीटेड आणि कूल्ड फ्रंट सीट्स, 14 वी इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, टू झोन क्लायमेट कंट्रोल, मेरिडियन सराउंड साउंड सिस्टम, 11.4 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, टीपीएमएस, लॉकिंग व्हील नट्स, क्रूझ कंट्रोल, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स अशी अनेक फीचर्स आहेत.
Tata Nano चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा
नवीन एसयूव्हीच्या लाँचिंगबद्दल बोलताना, रेंज रोव्हर जॅग्वार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन अंबा म्हणाले, “आमची ऑटोबायोग्राफी ट्रिम ही रेंज रोव्हरवर उपलब्ध असलेल्या टॉप-टियर लक्झरी ट्रिमपैकी एक आहे ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहेत. ही एक कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही आहे जी कोणत्याही तडजोडशिवाय तयार केली गेली आहे. रेंज रोव्हर इव्होकमध्ये प्रथमच, ही ट्रिम आलिशान सुडेक्लॉथ हेडलाइनिंग, स्लाइडिंग पॅनोरॅमिक रूफ, फुल एक्सटेंडेड लेदर अपग्रेड, पिक्सेल एलईडी हेडलाइट्स आणि बरेच काही यासारखी फीचर्स असतील.”
रेंज रोव्हर इव्होक ऑटोबायोग्राफी 69.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.