फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये धमाकेदार कार्स ऑफर होत असतात. यातही सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. ज्यामुळे अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. ग्राहक देखील या नव्या एसयूव्हीना चांगला प्रतिसाद देत आहे. काही काळापूर्वी, स्कोडाने देखील आपली नवीन एसयूव्ही Skoda Kylaq लाँच केली होती, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जर तुम्ही स्टायलिश, पॉवरफुल आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर स्कोडा क्यलॅक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. मात्र, मे 2025 मध्ये ही कार घरी आणण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागू शकते. यामागील कारण म्हणेज याची सतत वाढत जाणारी मागणी. यामुळेच Skoda Kylaq चा वेटिंग पिरियडही खूप वाढला आहे.
Ola S1Z आणि Ola Gig च्या डिलिव्हरीत विलंब, कंपनीच्या CEO ने सांगितले कारण
कायलॅक क्लासिकसाठी सर्वात जास्त वेटिंग पिरियड नोंदवला गेला आहे. जर तुम्हाला स्कोडा कायलॅकचा क्लासिक व्हेरियंट खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी 12 आठवडे म्हणजेच तब्बल 3 महिने वाट पहावी लागू शकते. मात्र, डीलरशिपमध्ये स्टॉक असल्यास हा वेळ थोडा कमी असू शकतो.
या दोन्ही व्हेरियंटसाठी वेटिंग पिरियड कालावधी सुमारे 2 महिने आहे. जर तुम्हाला कमी वेळेत डिलिव्हरी हवी असेल, तर मध्यम व्हेरियंट खरेदी करणाऱ्यांसाठी हा थोडा चांगला पर्याय असू शकतो.
जर तुम्हाला स्कोडा कायलॅक लवकर मिळवायची असेल, तर प्रेस्टीज व्हेरियंट हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचा वेटिंग पिरियड फक्त 1 महिन्यापर्यंत आहे, जर डीलरशिपवर स्टॉक उपलब्ध असेल तर तो आणखी लवकर उपलब्ध होऊ शकतो.
अलिकडेच काही व्हेरियंटच्या किमती बदलण्यात आल्या आहेत. काही व्हेरियंटच्या किमती 46,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, काही व्हेरियंटच्या किमतीत 36,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. नवीन किमती आता 8.25 लाख रुपयांपासून सुरू होऊन 13.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जातात. चला व्हेरियंटनुसार किंमत तपशील जाणून घेऊया.
जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे व्हेरियंट आणि वेटिंग पिरियड याबद्दल आधीच माहिती जाणून माहिती घ्या. तसेच डीलरशिपकडून स्टॉक आणि ऑफर्सबद्दल अपडेट्स मिळवत रहा. Skoda kylaq एक उत्तम एसयूव्ही असल्यामुळे तुम्हाला या कारसाठी थोडी वाट पहावी लागेल.