फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या आपल्या बेस्ट कार्समुळे ओळखल्या जातात. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने आतापर्यंत मार्केटमध्ये बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. मात्र, टाटा मोटर्स आता पुन्हा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी सुरु केलेला मान्सून चेक अप कॅम्प.
टाटा मोटर्सने त्यांच्या ग्राहकांसाठी मान्सून चेक-अप कॅम्पची घोषणा केली आहे. हा मान्सून चेक-अप कॅम्प 6 जून ते 20 जून 2025 पर्यंत सुरू करण्यात आला आहे. टाटा मोटर्सचा हा कॅम्पेन 500 हून अधिक शहरांमध्ये आणि 1,090 हून अधिक अधिकृत कार्यशाळांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. टाटा मोटर्सच्या मान्सून चेक अप शिबिरातून लोकांना कोणते फायदे मिळतील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
‘या’ कारच्या समोर सगळ्याच कार फेल ! फुल्ल टॅंकमध्ये मिळेल 1000 ची रेंज, विक्रीतही दमदार वाढ
पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात आणि लांबच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. यामुळे वाहनाची सुरक्षितता आणि परफॉर्मन्सवर परिणाम होतो. या मोसमात वाहनाची सुरक्षितता आणि त्याचे योग्य कार्यप्रदर्शन खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, टाटा मोटर्सचा हा चेक-अप कॅम्प टाटा वाहनांच्या मालकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
टाटा मोटर्सच्या मान्सून चेक अप कॅम्पमध्ये लोक त्यांच्या वाहनांची मोफत तपासणी करू शकतात, ज्यामध्ये 30 हून अधिक महत्त्वाचे टेस्टिंग पॉईंट समाविष्ट आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक डायग्नोस्टिक सर्व्हिस देखील समाविष्ट आहेत, ज्यामुळे ईव्ही मालकांना देखील फायदा होईल.
टाटा मोटर्सच्या मान्सून चेक-अप कॅम्पमध्ये, लोकांना मोफत कार टॉप वॉश, मूळ स्पेअर पार्ट्सवर विशेष सवलत, इंजिन ऑइल, अॅक्सेसरीज, एक्सटेंडेड वॉरंटी आणि लेबर चार्जेस मिळतील. यासोबतच, नवीन टाटा वाहनांवर आकर्षक एक्सचेंज ऑफर, ज्यामध्ये सध्याच्या वाहनाचे मोफत मूल्यांकन समाविष्ट आहे.
टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स मान्सून चेक-अप कॅम्प सुरू करणार आहे. याद्वारे, कंपनी ग्राहकांसोबत सुरक्षितता, विश्वास आणि सुविधेला प्राधान्य देते. कंपनी आपल्या ग्राहकांना या संधीचा लाभ घेण्यासाठी जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स वर्कशॉपला भेट देण्यास प्रोत्साहित करीत आहे.