फोटो सौजन्य: @dygmotors(X.com)
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार उपलब्ध आहेत. यात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. मात्र, सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही कार्सना असते. भारतात अनेक लोकप्रिय एसयूव्ही आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक एसयूव्ही.
May 2025 मध्येही ह्युंदाई क्रेटाची लोकप्रियता कायम राहिली आहे. ही मिड साइझ एसयूव्हीला केवळ एका महिन्यात 14,860 नवीन ग्राहकांनी खरेदी केले आहे, जे याची प्रचंड मागणी दर्शवते. परवडणारी किंमत, प्रगत फीचर्स आणि स्टायलिश डिझाइनच्या आधारे क्रेटाने स्वतःला या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक बनवले आहे. चला, ह्युंदाई क्रेटाची किंमत आणि त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
ना Ola ना Revolt, ‘या’ इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीची ग्राहकांना भुरळ, फक्त 1 वर्षात विकले लाखभर युनिट्स
ह्युंदाई क्रेटा 2025 मध्ये तीन इंजिन पर्याय आहेत. 17.4 ते 18.2 किमी प्रति लिटर मायलेज देणारे 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, अधिक पॉवर आणि रिफाइनमेंटसाठी ओळखले जाणारे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 21.8 किमी प्रति लिटर पर्यंत उत्तम फ्युएल एफिशियन्सी देणारे 1.5 लिटर डिझेल इंजिन. हे इंजिने मॅन्युअल, सीव्हीटी आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाइलला सपोर्ट करते.
Hyundai Creta चे केबिन आता पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि टेक्निकलीदृष्ट्या प्रगत झाले आहे. त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत, ही एसयूव्ही आता लेव्हल-2 ADAS फीचर्ससह येते, ज्यामध्ये लेन कीप असिस्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) यांचा समावेश आहे. हे सर्व मिळून ती भारतातील सर्वात सुरक्षित मध्यम आकाराच्या एसयूव्हींपैकी एक बनते.
मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, डिझेल व्हेरियंट 50 लिटर टँकसह 1000 किमी पेक्षा जास्त रेंज आणि 21.8 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर पेट्रोल व्हेरियंट 18.2 किमी प्रति लिटर मायलेजवर सिंगल फुल टँकवर 900 किमी पर्यंत प्रवास करू शकते. Hyundai Creta 2025 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत जाते, या किमती पोजिशन आणि इंजिन पर्यायांनुसार बदलू शकतात.