Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?
मारुती स्विफ्टच्या किमतीत Tata Punch Facelift लाँच झाल्याने दोन्ही कारची एकमेकांसोबत स्पर्धा होणार हे नक्की. चला दोन्ही कारच्या इंजिन, फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.
अलीकडेच टाटा पंच एसयूव्हीने त्याचे फेसलिफ्ट लाँच केले. 1.5-लिटर रेव्होट्रॉन इंजिनद्वारे समर्थित जे 87.8 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क निर्माण करते. दुसऱ्या इंजिन पर्याय 1.2 -लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 120 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करते. तिसरा इंजिन पर्याय 1.2-लिटर सीएनजी इंजिन आहे, जो 73.4 पीएस पॉवर आणि 103 एनएम टॉर्क निर्माण करतो.
मारुतीची स्विफ्ट 1.2-लिटर झेड-सिरीज माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. 1197 सीसी झेड-सिरीज माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन 81.6 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क निर्माण करते. हे पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एएमटी ट्रान्समिशनसह ऑफर केले जाते.
Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…
टाटा पंच फेसलिफ्टमध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, एक्सप्रेस कूल फंक्शन, ऑटो-डिमिंग IRVM, पुढील आणि मागील थाय सपोर्ट, सहा एअरबॅग्स, ESP, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ऑटो हेडलाइट्स, रेन-सेंसिंग वायपर्स, 26.03 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 17.78 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED टेल लॅम्प्स, 16-इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, LED फॉग लॅम्प्स, इको आणि सिटी ड्राइव्ह मोड्स तसेच आयडल स्टार्ट/स्टॉपसारखी फीचर्स देण्यात आले आहेत.
मारुती स्विफ्टमध्ये सहा-स्पीकर साउंड सिस्टीम, फ्रंट ट्वीटर्स, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन सस्पेंशन सेटअप, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले, सुजुकी कनेक्ट, हायड्रॉलिक क्लच, मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, दोन चार्जिंग पोर्ट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी स्विफ्टमध्ये सहा एअरबॅग्ससह हिल होल्ड असिस्ट, ESP, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ABS आणि EBD सारखी सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या
टाटा कंपनीने पंच फेसलिफ्ट भारतीय बाजारात 5.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केला आहे. या कारच्या पेट्रोल इंजिनच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये आहे. तर पंचचे CNG व्हेरिएंट्स 6.69 लाख रुपयांपासून उपलब्ध असून, CNG मधील टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख रुपये इतकी आहे.
दुसरीकडे, मारुती स्विफ्ट भारतात 5.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. स्विफ्टच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 8.65 लाख रुपये आहे.






