फोटो सौजन्य: Social Media
सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात अनेक जण नवीन कार किंवा बाईक विकत घेत असतात. यामुळेच ऑटो कंपनीज सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कार्सवर दमदार ऑफर लाँच करत असतात. काही कंपनीज तर आपल्या कारची किंमत या काळात कमी करताना दिसतात.
देशभरात इलेक्ट्रिक कार्स सध्या मोठ्या प्रमाणत लाँच होताना दिसत आहे. तसेच येत्या दिवाळी जास्त विक्री व्हावी म्हणून अनेक ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीवर सूट देत आहे. पण असे जरी असले तरी एमजी कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक कारची किंमत वाढवली आहे.
कार निर्मती कंपनी एमजीने ZS EV च्या किंमतीत 32 हजार रुपयांची वाढ केली आहे. काही ठराविक व्हेरियंटसच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हेक्टर, हेक्टर प्लस आणि एस्टरच्या किंमतीसुद्धा अपडेट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: हार्दिक पांडयापासून ते संजय दत्तपर्यंत, अनेक सेलिब्रेटींना पडली आहे ‘या’ कारची भुरळ
माहितीनुसार एमजी ZS EV च्या इसेन्स डार्क ग्रे व्हेरियंटमध्ये 32 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर 100 इयर एडिशन आणि इसेन्स ड्युअल टोन आयकॉनिक आयव्हरी व्हेरियंटच्या किंमतीत 31 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
MG ZS EV हे IP69K रेट केलेल्या 50.3kW बॅटरी पॅकसह दिले आहे, जे 8-लेयर हेयरपिन इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेले आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 174.33 bhp ची कमाल पॉवर आणि 280 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. MG ZS EV एका पूर्ण चार्जवर 461 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स सारखे 3 ड्रायव्हिंग मोड आहेत आणि ते 8.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.
हे देखील वाचा: होंडा कडून देशातील पहिली E85 Flex Fuel बाईक लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
MG ZS EV मध्ये पॅनोरामिक सनरूफ, 6-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट्स, पीएम 2.5 फिल्टर, ऑटो हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स, वायरलेस फोन चार्जिंग, फॉलो मी हेडलॅम्प्स, एलईडी लाइट्स आहेत. तसेच यात 25.7 सेमी-इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, सहा स्पीकर आणि ट्विटर ऑडिओ सिस्टीम सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.