फोटो सौजन्य: @Ryan_Bubear (X.com)
टोयोटाने भारतात त्यांच्या लोकप्रिय आणि पॉवरफुल एसयूव्ही फॉर्च्युनरचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. हे नवीन मॉडेल आता माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह आली आहे, जे पूर्वीपेक्षा जास्त मायलेज देईल आणि ड्राइव्ह देखील स्मूथ असेल. टोयोटाने या नवीन तंत्रज्ञानाचे नाव Neo Dri असे ठेवले आहे. याची किंमत 44.72 लाख रुपयांपासून सुरू होते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टोयोटाने या नवीन फॉर्च्युनरमध्ये तेच शक्तिशाली 2.8-लिटर डिझेल इंजिन ठेवले आहे, जे 204 एचपी पॉवर आणि 50 टॉर्क देते. मात्र, आता त्यात 48 व्ही माइल्ड हायब्रिड सिस्टम आहे, ज्यामध्ये बेल्ट इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर आणि लिथियम आयन बॅटरी समाविष्ट आहे. चला त्याचा सर्वात मोठा फायद्याबद्दल जाणून घेऊयात.
यात ऑटो स्टार्ट-स्टॉप फीचर आहे, ज्यामुळे ट्रॅफिकमध्ये इंजिन आपोआप चालू आणि बंद होते, ज्यामुळे मायलेज वाढते. आता त्यात सहज अॅक्सीलरेशन आणि स्मूद रायडींगचा अनुभव घेता येईल. त्यात इंजिनचा आवाज कमी आहे, त्यामुळे आत बसलेल्या लोकांना अधिक शांतता वाटेल.
80 KM चा धमाकेदार मायलेज ! घराघरात लोकप्रिय आहेत ‘या’ 5 स्वस्त बाईक
टोयोटा फॉर्च्यूनरच्या नव्या मॉडेल्समध्ये “निओ ड्राइव्ह माइल्ड हायब्रिड” तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाने सुसज्ज दोन व्हेरियंट सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये Fortuner Neo Drive Mild Hybrid ची किंमत 44.72 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर अधिक प्रीमियम आणि स्टायलिश पर्याय असलेल्या Legender Neo Drive Mild Hybrid ची किंमत 50.09 लाख (एक्स-शोरूम) आहे. दोन्ही मॉडेल्स मायलेज आणि परफॉर्मन्स यांचा उत्तम समतोल साधतात. हे दोन्ही व्हेरियंट फॉर्च्युनरच्या नियमित 4×4 AT व्हेरियंटपेक्षा सुमारे 2 लाखांनी महाग आहेत.
यावेळी टोयोटाने काही नवीन सेफ्टी फीचर्ससह फॉर्च्युनर आणि लेजेंडर निओ ड्राइव्ह व्हेरियंट लाँच केले आहेत. यात 360 डिग्री कॅमेरा, 7 एअरबॅग्ज, हिल असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम सारखी फीचर्स आहेत. डिझाइन आणि इंटिरिअरमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. तेच ड्युअल-टोन लेदर इंटिरिअर आणि तेच मजबूत बॉडी स्टाईल पूर्वीसारखेच आहे. आता त्याच्या मागे फक्त ‘निओ ड्राइव्ह’ बॅज असणार आहे .
लवकरच लाँच होणार Maruti ची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार ! फीचर्स असे की कार खरेदी करण्यासाठी रांग लावाल
या एसयूव्हीची बुकिंग आजपासून म्हणजेच 2 जून 2025 पासून सुरू झाली आहे. त्याच वेळी, त्याची डिलिव्हरी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल.