फोटो सौजन्य: iStock
दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आजही बाईक खरेदी करताना ग्राहक दोन गोष्टींकडे आवर्जून पाहतो. एक म्हणजे बाइकची किंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा मायलेज. जर एखादी बाईक स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देत असेल. तर मग नक्कीच तिच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसते.
खरंतर, लोकं दररोजच्या प्रवासातही अशा मोटारसायकलच्या शोधात असतात जी किफायतशीर असेल आणि चांगले मायलेज देईल. या बाईक्सची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे. म्हणूनच, आज आपण अशा लोकप्रिय बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरू शकतात.
लवकरच लाँच होणार Maruti ची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार ! फीचर्स असे की कार खरेदी करण्यासाठी रांग लावाल
या यादीत, पहिली बाईक TVS Sport आहे, ज्यामध्ये 109.7 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 6,350 rpm वर 6.03 kW पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक 90 kmph चा टॉप स्पीड देते. TVS Sport चा मायलेज 80 kmpl आहे. या TVS बाईकची एक्स-शोरूम किंमत 59,881 रुपयांपासून सुरू होते.
Hero HF Deluxe ही देखील एक परवडणारी बाईक आहे. या बाइकमध्ये 97.2 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन आहे. याचे इंजिन 5.9 किलोवॅट पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क देते. या बाईकमध्ये अॅडव्हान्स्ड प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन सिस्टम आहे. हिरोची ही बाईक 75 किमी प्रति लिटर मायलेज देते. हिरो एचएफ डिलक्सची एक्स-शोरूम किंमत 59,998 रुपयांपासून सुरू होते.
500 KM ची रेंज, हायटेक फीचर्स आणि बरंच काही ! उद्या लाँच होणार Tata Harrier EV
होंडा शाइन 100 ही बाईक चांगला मायलेज देण्यासाठी ओळखली जाते. या बाईकमध्ये 4-स्ट्रोक, एसआय इंजिन आहे, जे 7,500 आरपीएमवर 5.43 किलोवॅट पॉवर आणि 5,000 आरपीएमवर 8.05 एनएम टॉर्क देते. ही बाईक 65 किमी प्रति लिटर मायलेज देते. होंडा शाइन 100 ची एक्स-शोरूम किंमत 66,900 रुपये आहे.
टीव्हीएस रेडियनमध्ये 109.7 सीसी, 4-स्ट्रोक बीएस-VI इंजिन आहे. हे इंजिन 7,350 आरपीएम वर 6.03 किलोवॅट पॉवर आणि 4500 आरपीएम वर 8.7 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 63 किमी अंतर कापण्याचा दावा करते. टीव्हीएस रेडियनची एक्स-शोरूम किंमत 70,720 रुपयांपासून सुरू होते.