फोटो सौजन्य: Gemini
November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री
मारुतीची लोकप्रिय SUV ब्रेझाला 2022 नंतर पहिल्यांदाच मोठा अपडेट मिळणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये लाँच होणाऱ्या या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन LED लाइटिंग, रिफ्रेश्ड ग्रिल आणि अधिक प्रीमियम इंटिरिअर देण्यात येणार आहे. यात 1.5-लीटर K-Series पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 105 PS पॉवर आणि अंदाजे 20–22 kmpl मायलेज देईल.
फीचर्समध्ये मोठे टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्स, ESP यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात येतील. या SUV ची सुरुवातीची किंमत 8.5 लाख रुपये आसपास असण्याची शक्यता आहे.
फ्रॉन्क्सचा नवीन हायब्रिड व्हेरिएंट 2026 च्या सुरुवातीला बाजारात येईल. यात 1.2-लीटर Z12E पेट्रोल इंजिन आणि सीरीज हायब्रिड टेक्नॉलॉजीचा समावेश असेल, ज्यामुळे 35 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळू शकते. नवीन ग्रिल, LED हेडलॅम्प्स आणि सनरूफ दिला जाईल. लेवल-1 ADAS फीचर्स जसे की Adaptive Cruise Control, Lane Keep Assist यामुळे ही SUV अधिक स्मार्ट होईल. या एसयूव्हीची किंमत 7.5 ते 13 लाख रुपये दरम्यान असण्याचा अंदाज आहे.
टाटाची नवी नेक्सॉन, ज्याचे कोडनेम ‘Garud’, असे ठेवण्यात आले आहे ती 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. याचे डिझाइन Curvv EV पासून प्रेरित असेल आणि अनेक प्रीमियम फीचर्स जोडले जातील. या नव्या मॉडेलमध्ये ट्विन 12.3-inch स्क्रीन, हँड्स-फ्री बूट आणि स्मार्ट डोर हँडल्स मिळू शकतात. ADAS आणि 6 एअरबॅग्समुळे सुरक्षा अधिक उंचावेल.
EV व्हर्जनमध्ये 45 kWh आणि 55 kWh बॅटरी पर्याय मिळतील, ज्यांची रेंज 489 ते 585 km असेल. ICE मॉडेलमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध राहतील. सुरुवातीची किंमत सुमारे 8 लाख रुपये पासून सुरू होऊ शकते.






