मारुती सुझुकीने आपल्या पर्यायी इंधन वाहनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत लोकप्रिय वॅगनआरचे नवीन ‘बायोफ्लेक्स’ (Bioflex) व्हर्जन सादर केले आहे. हे मॉडेल जास्त इथेनॉल-मिश्रित इंधनावर चालण्यासाठी खासकरून विकसित करण्यात आले आहे. आत्ता सध्या ते फक्त व्यावसायिक ग्राहक आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
नवीन वॅगनआर बायोफ्लेक्स ही वॅगनआरच्या टॉप-स्पेक ZXi+ व्हेरिएंटवर आधारित आहे. बाह्य डिझाइनच्या बाबतीत हे मॉडेल सामान्य वॅगनआरसारखेच दिसते. त्याची उंच ‘टॉल-बॉय’ रचना, आकर्षक लूक आणि प्रशस्त केबिन कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, बायोफ्लेक्स ओळखण्यासाठी गाडीवर खास बायोफ्लेक्स बॅजिंग आणि फ्लेक्स-फ्युएल ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट
आतील भागातही टॉप व्हेरिएंटमधील सर्व प्रमुख सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ड्युअल-टोन इंटिरिअर, फॅब्रिक सीट्स, मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील आणि 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणालीचा समावेश आहे. ही प्रणाली Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), रिअर पार्किंग सेन्सर्स, फ्रंट फॉग लॅम्प्स, मागील एसी व्हेंट्स आणि चार-स्पीकर ऑडिओ सिस्टीमसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
वॅगनआर बायोफ्लेक्समध्ये 1.2-लिटर K-सीरीज चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन अधिक प्रमाणातील इथेनॉलयुक्त इंधनावर चालण्यासाठी सुधारित करण्यात आले आहे. यासाठी इंधन इंजेक्टर्स, फ्युएल पंप आणि इंधन वाहिन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच इथेनॉलचे प्रमाण ओळखणारा विशेष सेन्सर आणि सुधारित इंजिन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर देण्यात आले आहे.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
कंपनीने अद्याप या मॉडेलची पॉवर आणि टॉर्कची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, सामान्य 1.2-लिटर वॅगनआर इंजिन 91 एचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क निर्माण करते.
या नव्या वॅगनआर बायोफ्लेक्सची एक्स-शोरूम किंमत 7.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत नियमित वॅगनआर ZXi+ मॅन्युअलपेक्षा सुमारे 86,000 रुपये अधिक आहे. इथेनॉल-सुसंगत तंत्रज्ञानासाठी करण्यात आलेल्या अभियांत्रिकी बदलांमुळे या मॉडेलची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे.






