इथॅनॉल ब्लेंडिंगच्या विषयाने मागच्या काही दिवसात्त बराच जोर घेतला आहे. त्यातच ARAI चे रिपोर्ट्स समोर आल्याने E20 इंधनामुळे गाडीच्या इंजिनावर परिणाम होतो, त्याचे काही पार्टस खराब होऊ शकतात, हे समोर आले आहे. आपल्याला ही प्रश्न पडला असेल कि हे इथॅनॉल ब्लेंडिंगच्या बद्दल अशी वाजवी माहिती देणारे ARAI नक्की आहे तरी काय? याची भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाशी नेमकी कशी सोयरीक आहे? आज हे पाहन घेऊयात.
काय आहे ARAI?
ARAI म्हणजेच ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’(Automotive Research Association of India) ही भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि स्वायत्त संशोधन संस्था आहे. १९६६ मध्ये भारतीय ऑटोमोबाईल उद्योग आणि भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. पुण्यात मुख्यालय असलेली ही संस्था देशातील वाहनांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरकता तपासण्याचे सर्वोच्च काम करते.
भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी ARAI ची भूमिका
भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्राला, सखल वाहन उद्योगाला जागतिक दर्जाचे बनवण्यात आणि रस्ते आणि परिणामी वाहतूक सुरक्षित ठेवण्यात ARAI अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते. ऑटोमोबाईल उद्योगासाठी त्यांचे कार्य मोठ्या परिघात येते.
वाहनांची चाचणी आणि प्रमाणीकरण
भारतात तयार होणारे किंवा आयात केले जाणारे कोणतेही वाहन बाजारात येण्यापूर्वी त्याला ‘सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स’ (CMVR) नुसार प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र देणारी ARAI ही देशातील मुख्य संस्था आहे.
सुरक्षिततेची मानके
गाड्यांची मजबूती, क्रॅश टेस्ट, एअरबॅग्ज आणि ब्रेक यांसारख्या सुरक्षा घटकांची तपासणी करून ही संस्था वाहनांना सेफ्टी रेटिंग देते. एका भारतीय नागरिकाच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी ही संस्तः प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ही घेते. ‘भारत NCAP’ सारख्या सुरक्षा प्रणालीमध्ये ARAI चे योगदान मोलाचे आहे.
प्रदूषण नियंत्रण आणि इंधन मायलेज
भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे मायलेज तपासण्याचे अधिकृत काम ARAI करते. तसेच, बीएस-६ सारख्या कठोर उत्सर्जन नियमांनुसार वाहने पर्यावरणपूरक आहेत की नाही, हे तपासण्याची यंत्रणा या संस्थेकडे आहे. म्हणजे तुमचे वाहन जे मायलेज देते त्याची चाचणी परीक्षा त्याने ARAI कडे दिलेली असते.
संशोधन-विकास आणि इलेक्ट्रिक वाहनांन प्रोत्साहन
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा करणे, हलक्या वजनाचे सुटे भाग विकसित करणे, भारतीय वाहन उद्योगांना प्रोत्साहन देणे, भविष्यातील तंत्रज्ञानावर संशोधन करण्याचे काम ही संस्था करते.
ई-मोबिलिटीसाठी स्वतंत्र ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करून, ही संस्था ईव्ही बॅटऱ्या, चार्जिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक मोटर्सच्या सुरक्षिततेचे प्रमाणीकरण करते. इलेक्ट्रिक वाहतुकीच्या भविष्यासाठी ही संस्था जोमाने कार्य करत आहे.
याशिवाय, देशातील ऑटोमोबाईल कायदे आणि नियम तयार करताना भारत सरकारला तांत्रिक सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम काम ARAI करते. नागरिकांच्या दिनचर्येवर ARAI चा मोठा परिणाम होतो म्हणायला होतो. . भारतातील रस्ते अधिक सुरक्षित आणि हवा अधिक शुद्ध ठेवण्यात ARAI हा एक भक्कम कणा आहे. संस्थेची कार्ये, जबाबदाऱ्या, भूमिका भारतीय नागरिकाच्या दैनंदिन दळणवळनावर,राहणीमानावर मोठा परिणाम करतात.
संथपणे धावणाऱ्या जुन्या ऑटोमोबाईल उद्योगाला आधुनिक, सुरक्षित आणि हरित बनवण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात ARAI च्या संशोधन आणि कठोर नियमावलीला जाते.






