फोटो सौजन्य: YouTube
दुबई नेहमीपासूनच भारतीयांसाठी एक आकर्षणाचे शहर मानले गेले आहे. दुबईतील बुर्ज खलिफा असो की तिकडचे ऐश्वर्य, या सर्व गोष्टी एकदा तरी पाहायला मिळाव्या हे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. हल्ली बहुतेक जणांना दुबईला जाता येत नसले तरी युट्युबच्या माध्यमातून ते दुबईतील जीवनशैली जाणून घेत आहे.
युट्युबवरील दुबईच्या कित्येक वलॉंग मध्ये आपण पहिले असेल, कसे सोनं आणि मोबाईल भारताच्या तुलनेत तिथे स्वस्त आहे. पण भारतात असणाऱ्या लक्झरी कार्स सुद्धा तिकडे कमी किंमतीत मिळेत असेल का?
लोकांमध्ये पूर्वीही कारची क्रेज होती आणि आजही आहे. आजच्या काळात अनेक नवीन आणि दमदार वाहने लाँच होत आहेत. या वाहनांच्या यादीत लक्झरी कार्सचे सुद्धा नावे आहेत. या कार्सना भारतापासून दुबईपर्यंत मोठी मागणी आहे. पण भारतीय बाजारात उपलब्ध असणारी रोल्स रॉइस फँटमची किंमत ही 10 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. पण दुबईच्या बाजारात या कारची किंमत किती? चला जाणून घेऊया.
रोल्स रॉयस फँटम कूपचे 2016 मॉडेल दुबईच्या बाजारपेठेत उपलब्ध आहे. दुबईमध्ये या कारची किंमत AED 1,650,000 आहे. ही किंमत भारतीय चलनात 3.77 कोटी रुपये आहे. भारताच्या तुलनेत दुबईमध्ये ही कार खूप स्वस्त आहेत. या कारणास्तव, या अरब देशात बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि मर्सिडीज सारख्या अनेक लक्झरी कार्सचा वापर टॅक्सी म्हणून सुद्धा होताना दिसतो.
रोल्स रॉयस फँटम ही एक आलिशान कार आहे, ज्यामध्ये पाच जण एकत्र आरामात बसू शकतात. या कारमध्ये 6749 सीसी इंजिन आहे, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहे. हे इंजिन 563 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची भारतातील एक्स-शोरूम किंमत 8.99 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते.






