फोटो सौजन्य: iStock
पावसाळा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी होणे आणि रस्त्याच्या मधोमध वाहने अडकणे या सामान्य समस्या आहेत. मात्र अशा परिस्थितीत, शहाणपण आणि सावधगिरी बाळगणे महत्वाचे. खरं तर, बऱ्याचदा रस्त्यांवर काही खड्डे असतात ज्यामध्ये तुमची कारमध्येच अडकू किंवा बंद पडू शकते.
जर कार अडकली नाही तर बऱ्याचदा पाण्यामुळे ती थांबते. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेऊयात की कार पाण्याने भरलेल्या रस्त्यावर अडकली तर तुम्ही या समस्येतून तोडगा कसा काढाल?
हल्ली अनेक कार्समध्ये ऑटो लॉकिंग सिस्टीम ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. पण काही वेळा पूर किंवा पाणी साचलेल्या परिस्थितीत कारचे दरवाजे आपोआप लॉक होतात. अशा वेळी घाबरून न जात सर्वप्रथम प्रयत्न करा की कार बंद पडू नये आणि ती हळूहळू पुढे चालवत राहा. जर कार पूर्णपणे बंद झाली आणि दरवाजा उघडत नसेल, तर त्याची साईड काच फोडणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय ठरतो.
लिमिटेड टाइम ऑफर! ‘या’ कारवर तब्बल 3 लाख रुपये वाचवण्याची संधी, असा फायदा पुन्हा होणार नाही
जर रस्त्यावर पाणी साचलेले दिसले, तर कार मध्येच बंद करण्याची चूक करू नका. असे केल्यास पाणी इंजिनपर्यंत पोहोचू शकते आणि मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
अनेक लोक कार बंद झाल्यावर लगेच ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतात, पण ही मोठी चूक ठरते. पाणी इंजिनच्या पार्ट्सना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे कार सुरक्षित ठिकाणी न्यावी आणि मेकॅनिक किंवा इमर्जन्सी सर्व्हिसला संपर्क करावा.
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…
पावसाळ्यात वेगाने कार चालवणे मजेदार वाटू शकते, पण ते धोकादायक असते. वेग जास्त असल्यास वारंवार ब्रेक लावावे लागतात आणि ब्रेक सिस्टीममध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात कार नेहमी मंद आणि नियंत्रित वेगात चालवावी.