अन्य एसयूव्हींमध्ये Audi Q3 एवढी खास का ठरते? 'ही' आहेत 5 कारणं
जर तुम्हाला लक्झरी SUV खरेदी करायची असेल, तर ऑडी Q3 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ही कार आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स, आणि ऑडीची विश्वसनीय इंजिनिअरिंग दर्शवते. Q3 तीन व्हेरियंट्समध्ये – प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी. या कारची किंमत 44,99,000 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. चला ही कार एवढी खास का आहे? यामागची कारणे जाणून घेऊया.
Q3 चे स्पोर्टी आणि डायनॅमिक डिझाइन कोणत्याही कोनातून प्रीमियम दिसते. अष्टकोनी सिंगल फ्रेम ग्रिल, धारदार एलईडी हेडलॅम्प्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि हाय-ग्लॉस स्टायलिंग पॅकेज यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक होतो. ही कार नवेरा ब्ल्यू आणि पल्स ऑरेंजसह पाच विविध रंगांमध्ये येते, जे ती रस्त्यावर एक वेगळीच ओळख निर्माण करते.
Tata Tiago EV च्या बेस्ट व्हेरियंटसाठी 1 लाखाचे Down Payment केले तर किती असेल EMI ?
Q3 मध्ये 2.0 लिटर TFSI पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 190 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क निर्माण करते. केवळ 7.3 सेकंदांत ही SUV 0 ते 100 किमी/तास वेग गाठते. ऑडीचे क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम विविध रस्त्यांवर उत्तम नियंत्रण, स्थिरता आणि ग्रिप प्रदान करते. ड्रायव्हरला Audi Drive Select द्वारे वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोड्सची निवड करता येते, जी ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी खास बनवते.
Q3 चा इंटिरिअर केवळ आधुनिकच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्याही समृद्ध आहे. ड्रायव्हरला Audi Virtual Cockpit Plus, MMI टचसह MMI नेव्हिगेशन Plus यामुळे एक संपूर्ण डिजिटल अनुभव मिळतो. याशिवाय, 30-कलर अॅम्बियंट लायटिंग, वायरलेस चार्जिंगसह Audi Phone Box आणि 10-स्पीकर ऑडी साऊंड सिस्टममुळे प्रत्येक प्रवास स्मार्ट, आनंददायी आणि कनेक्टेड होतो.
Kia नवीन Electric SUV लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या भारतात केव्हा होईल लाँच?
कंपॅक्ट असली तरी Q3 मध्ये 530 लिटरची बूट स्पेस आहे, जी या सेगमेंटमधील सर्वात जास्त आहे. पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, लंबर सपोर्ट आणि रिअर सीट्ससाठी अॅडजस्टमेंट ही फीचर्स प्रवास अधिक आरामदायी करतात .
सुरक्षिततेसाठी Q3 मध्ये सहा एअरबॅग्ज, ISOFIX माउंट्स, हिल स्टार्ट असिस्ट, पार्किंग एडसह रिअर व्ह्यू कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी प्रगत फीचर्स आहेत, जे प्रवाश्यांना उत्तम सेफ्टी प्रदान करते.
एकंदरीत, ऑडी Q3 ही लक्झरी, परफॉर्मन्स, तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांचे उत्तम मिश्रण आहे, पहिल्यांदा लक्झरी कार घेणाऱ्यांसाठी ही कार एक आदर्श निवड.