फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. म्हणूनच तर आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे. यातीलच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे किया. कियाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. पण आता कंपनीचे लक्ष EV सेगमेंटकडे वळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किया मोटर्स भारतात कोणती आणि कधीपर्यंत ही कार लाँच करू शकते. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किया मोटर्स भारतात एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु, अद्याप निर्मात्याकडून याची पुष्टी झालेली नाही. पण पुढील काही महिन्यांत ही नवीन EV सादर केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
आता भारतीय रस्त्यांवर दिसणार 2025 Kawasaki Ninja 650 चा जलवा, नव्या रंगात लाँच झाली बाईक
रिपोर्ट्सनुसार, किया कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करू शकते. अशा परिस्थितीत, कंपनी Kia Syros चे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करू शकते अशी शक्यता आहे. \
रिपोर्ट्सनुसार, जर Kia Syros EV भारतात लाँच झाली, तर त्याच्या ICE व्हर्जनच्या तुलनेत EV व्हर्जनच्या डिझाइनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. ईव्ही व्हर्जनमध्ये पुढची ग्रिल बंद करता येते. यासोबतच, EV व्हर्जनमध्ये, चार्जिंग पोर्ट फ्रंट बंपरमध्ये दिला जाऊ शकतो. एसयूव्हीच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील्स वापरले जाऊ शकतात.
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तुटून पडलेत ग्राहक ! 53 टक्के मार्केटवर एकट्याने गाजवतेय वर्चस्व
सध्या ही माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की कंपनी किया सायरोस ईव्हीमध्ये सुमारे 450 ते 500 किलोमीटरच्या रेंजची बॅटरी देऊ शकेल. याशिवाय, त्याच्या इंटिरिअरमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात आणि त्यात काही नवीन फीचर्स देखील जोडली जाऊ शकतात. ज्यामध्ये ADAS, 360 डिग्री कॅमेरा सारख्या अनेक फीचर्सचा समावेश असेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाची ही नवीन एसयूव्ही 2026 च्या मध्यापर्यंत भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते. सध्या, किया इंडियाने या संदर्भात कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.