फोटो सौजन्य: Social Media
प्रत्येक मध्यम व्यक्तीचे स्वप्न असते की त्यांची स्वतःची कार असावी. पण याही पेक्षा मोठे स्वप्न असते की आपली स्वतःच लक्झरी कार असावी. आपल्याकडे नेहमीच लक्झरी कार्सबद्दल जास्त चर्चा होताना दिसतात. आजही जर रस्त्यावर एखादी लक्झरी कार दिसली की अनेकांच्या नजर आपसूकच त्या कारकडे रोखल्या जातात. यातीलच लक्झरी कार्स म्हणजे जग्वार लँड रोव्हरच्या कार्स.
जग्वार लँड रोव्हर कार भारतासह जगभरात पसंत केल्या जातात. या कारची लोकप्रियता केवळ सेलिब्रिटींमध्येच नाही तर सर्वसामान्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2025 चे विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या किरकोळ विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
जग्वार लँड रोव्हरच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत किरकोळ विक्री 36 टक्क्यांनी वाढून 3 हजार 214 युनिट्सवर गेली आहे. या कालावधीत कंपनीने 3 हजार 214 एसयूव्हीची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्याने अधिक आहे. तसेच डिफेंडर एसयूव्हीच्या मागणीत सुद्धा चांगली वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची विक्री 75 टक्क्यांनी वाढली आहे.
खरंतर कोटींच्या कार विकत घेण्यामागे सर्वात मोठे कारण असते ते स्टेट्स व त्यातील दमदार फीचर्स. जे हाय परफॉर्मन्स आपल्याला लक्झरी कार्समध्ये बघायला मिळते ते नॉर्मल कार्समध्ये पाहायला मिळत नाही. म्हणूनच लक्झरी कार्सकडे श्रीमंत लोकं जास्त आकर्षित होत असतात.
लँड रोव्हर डिफेंडर एसयूव्हीचे सर्व मॉडेल्स अतिशय आकर्षक आणि शक्तिशाली लूकसह येतात. यामध्ये डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), उत्तम लुक असलेले बोनेट, मिनिमलिस्ट ग्रिल, आकर्षक एलईडी हेडलाइट्स, ऑटो फोल्ड आऊट साइड रीअर व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम) आणि 20-इंच अलॉय व्हील यांचा समावेश आहे. अनुलंब पोस्ट केलेले LED टेललॅम्प आणि मागील बाजूस टेलगेट माउंट केलेले स्पेअर व्हील देखील आहेत.
या जबरदस्त एसयूव्हीचा इंटिरिअर 6 लोकांच्या आसनक्षमतेसह खूप आलिशान आहे. या लक्झरी कारच्या केबिनमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टेड 11.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल (ACC), रिअर एअर कंडिशनर व्हेंट, की-लेस एंट्री आणि क्रूझ कंट्रोलसह मल्टीफंक्शनल पॉवर स्टीयरिंग व्हील आहे.