फोटो सौजन्य: iStock
कार असो की बाईक, वाहन चालकांना नेहमीच ट्रॅफिक रुल्स फॉलो करावा लागतो. जे ट्रॅफिक रुल्स फॉलो करत नाही, त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशावेळी पोलिसांकडून मोठा दंड देखील आकाराला जाऊ शकतो. ट्रॅफिक नियम अनेक प्रकारचे असतात. यात ट्रॅफिक सिग्नल्स लाइट्सना फॉलो करणे अत्यंत महत्वाचे आहे.
प्रवास करताना अनेकदा आपले लक्ष ट्रॅफिक सिग्नलकडे असतेच. क्वचितच असा कोणी असेल ज्याला ट्रॅफिक सिग्नलबद्दल माहिती नसेल. ट्रॅफिक सिग्नल्समध्ये आपल्याला तीन रंग दिसतात. लाल, हिरवा किंवा पिवळा. त्यात कोणती लाइट असताना काय करावे हे देखील अनेकांना माहित असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रॅफिक सिग्नलच्या लाईटसाठी हे तीन रंगच का निवडले गेले? चला यामागची इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊयात.
10 डिसेंबर 1868 रोजी लंडनमध्ये पहिला ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आला होता, जो पार्लमेंट स्क्वेअरवर बसवण्यात आला. त्या काळातील ट्रॅफिक सिग्नल सध्याच्या काळासारखा नव्हता. खरं तर, त्या काळात हा सिग्नल रेल्वे सिग्नल सिस्टीमप्रमाणे मॅन्युअली चालवावा लागत असे, ज्याची जबाबदारी एका पोलिस कर्मचाऱ्यावर सोपवण्यात आली होती. त्याकाळी फक्त लाल आणि हिरवे लाइट्स वापरले जात होते.
असे म्हटले जाते की दोन्ही लाइट्स एका खांबावर बसवले होते जे पूर्वी गॅसवर चालत असे. त्या काळात लंडनमध्ये घोडे धावत असत. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांना रस्ता सापडत नव्हता. तसेच घोड्यांमुळे अनेक लोक देखील जखमी झाले होते. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नल चालवण्यास सुरुवात झाली. परंतु, एकदा गॅस भरल्यामुळे मोठा स्फोट झाला होता, ज्यामुळे एक पोलिस जखमी झाला. तेव्हापासून, ट्रॅफिक सिग्नल बंद आहेत.
सुमारे 50 वर्षे या ट्रॅफिक लाइट्स बंद होते. यानंतर 1929 मध्ये ब्रिटनमध्ये ते पुन्हा सुरू झाले. 1921 मध्ये William Pott यांनी अमेरिकेत तीन लाइट्सचा ट्रॅफिक सिग्नल बनवला. जो आजपर्यंत वाहतूक नियमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज जगभरात गर्दी नियंत्रित करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलचा वापर केला जात आहे. विल्यम पॉट पोलिस होते.
1 लाखाच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत टॉप 5 सेफ्टी बाईक्स, मिळेल सुरक्षिततेची हमी
लाल रंगला धोक्याचे लक्षण मानले जाते. म्हणूनच वाहनं थांबवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याचे आणखी एक कारण म्हणजे लाल रंग दुरून चमकतो. जो आपल्या डोळ्यांना सहज दिसतो. म्हणूनच, थांबण्याचा संकेत देणाऱ्या लाईटच्या रंगासाठी लाल रंगाची निवड झाली.
हिरवा रंग निसर्ग आणि शांतीचे प्रतीक आहे. आता तुम्हाला वाटेल की ट्रॅफिक लाईटमध्ये त्याचा काय उपयोग असणार? खरंतर हिरवा रंग धोक्याच्या अगदी विरुद्ध आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही कोणत्याही धोक्याशिवाय पुढे जाऊ शकता. जेव्हा ट्रॅफिक सिग्नलमध्ये हिरवा रंग पेटवला जातो तेव्हा तुम्हाला पुढे जावे लागते.
वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ट्रॅफिक लाईटमध्ये पिवळा रंग वापरला जातो. हा रंग ऊर्जा आणि सूर्याचे प्रतीक मानला जातो.