फोटो सौजन्य: Gemini
जपानमध्ये यामाहाने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha Jog E सादर केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट, व्यावहारिक आणि परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी शहरातील प्रवाशांसाठी डिझाइन केलेली आहे. यात अनेक प्रभावी फीचर्स आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर आयसीई-चालित जॉग स्कूटरची जागा घेते. चला या स्कूटरच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Skoda च्या वाहनांना जबरदस्त मागणी! 20 लाख वाहन उत्पादनाचा टप्पा केला पार
या इलेक्ट्रिक स्कूटरचे खास फीचर्स म्हणजे त्याचे स्वॅपेबल बॅटरी सिस्टीम. कंपनीने होंडा, सुझुकी, यामाहा आणि कावासाकी यांच्या सहकार्याने ही स्कूटर विकसित केली आहे. यात 1.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. Jog E मध्ये सिंगल स्वॅपेबल बॅटरी पॅक आहे. ही स्वॅपेबल बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर फक्त 53 किमीची रेंज देते. यात एसी सिंक्रोनस मोटर आहे, जी 2.3 पीएस पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते.
Yamaha Jog E मध्ये पुढे 12-inch आणि मागे 10-inch ची व्हील्स दिली आहेत. पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक मिळतो. सोबतच कॉम्बी ब्रेक सिस्टीमचाही समावेश आहे. Yamaha च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ड्युअल शॉक अब्झॉर्बर दिले आहेत.
घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या
या स्कूटरचे डिझाइन साधे, क्लीन आणि मॉडर्न आहे. ही स्कूटर Grey Metallic आणि Light Grey दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे Dark. यात ऑल-LED लाईटिंग, पॉलीगोनल हेडलॅम्प, सर्क्युलर मिरर्स, फ्लॅट बॉडी पॅनेल, इंटिग्रेटेड इंडिकेटर्ससह हॉरिझॉन्टल टेल-लॅम्प दिला आहे. तसेच 500 ml फ्रंट युटिलिटी पॉकेट, USB Type-A चार्जिंग स्लॉट, मोठा हुक, सीटखाली स्टोरेज आणि इन्व्हर्टेड LCD इन्स्ट्रुमेंट स्क्रीन मिळते. स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड्सही दिले आहेत.
Yamaha Jog E इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 159,500 JPY (सुमारे ₹90,000) ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त स्कूटरसाठी आहे. तिच्या बॅटरी आणि स्वॅपिंग सर्व्हिससाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.






