सुदानमध्ये भीषण नरसंहार! गृहयुद्धात आता ड्रोन्सची एन्ट्री; हल्ल्यात ७० हून अधिक ठार, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या तीन वर्षांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) मध्ये सत्ता वर्चास्वावरुन संघर्ष सुरु आहे. एप्रिल २०२३ नंतर या संघर्षाने तीव्र रुप धारण केल असून आतपार्यंत या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच झालेल्या ताज्या हल्ल्यांनी सुदानमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातचावरण पसरले आहे. RSF वर दाट लोकवस्तीमध्ये ड्रोन हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुदानमधील स्थानिक नागरिकांचा निष्पाप बळी जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या अहवालानुसार, आतपर्यंतच्या संघर्षात सुमारे ४०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे, १.२ कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुदानच्या कोर्डोफोन क्षेत्रात सतत हवाई हल्ले आणि ड्रोन्सचा वापर वाढल्याने ते युद्धाचे मुख्य केंद्र बनले आहे. मात्र यामुळे सामान्यांचे दैनंदिन जीव विस्कळीत झाले आहे.
RSF कडून ड्रोन हल्ल्यांचे प्रमाणा अधिक वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठा, रुग्णालये, निवासी वस्तींमध्ये हल्ले केले जात आहे. यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी, सुदान लष्कराने दक्षिण कॉर्डोफान प्रांताची राजधानी कदुगली आणि शेजारच्या डिलिंग शहराचा RSF चा वेढा तोडल्याचा दावा केला आहे.
संयुक्त राष्ट्राचा इशारा
दरम्यान सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे सुदानमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे भीषण ड्रोन वॉरची चिंता व्यक्त केली जात आहे. शाळा आणि आरोग्य सुविधांच्या ठिकाणांना लक्ष केले जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे दुर्गम भागांमध्ये मदत पोहचणे देखील कठीण झाले आहे.
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO
Ans: सुदानमध्ये गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष सुरु आहे. यामुळे सतत ड्रोन हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
Ans: नुकत्याच ताज्या घटनेनुसार, सुदानच्या कोर्डोफान प्रांतात निमलष्करी दलाने ड्रोन हल्ले केले आहेत.
Ans: सुदानच्या कोर्डोफान येथील ड्रोन हल्ल्यात ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: संयुक्त राष्ट्रांनी सुदानमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन्सचा वापर वाढत असून नागरिकांसाठी विनाशकारी ठरु शकतो असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राने भीषण ड्रोन युद्धाची चिंता व्यक्त केली आहे.






