फोटो सौजन्य: R Rajesh Vlogs (YouTube)
भारतात लक्झरी आणि आलिशान कारची एक वेगळीच क्रेझ पाहयला मिळते. त्यातही आयुष्यात एकदा तरी आलिशान कार चालवायला मिळावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न लोकप्रिय युट्युबर आणि ट्रक ड्रायव्हर राजेश यांचे पूर्ण झाले आहे. त्यांना लोकं R Rajesh Vlogs या युट्युब चॅनलमुळे ओळखतात.
लॉकडाउनमध्ये जेव्हा लोक घरात अडकून पडलीत. तेव्हा लोकांना मनोरंजनासाठी बाहेर पडत येत नव्हते. यावेळी अनके जणांनी ही संधी ओळखत आपले स्वतःचे युट्युब चॅनल चालू केले आहे. यातीलच एक होते राजेश. राजेश हे एक ट्रॅक ड्रायव्हर आहे, जे आपल्या ट्रकमध्ये विविध पदार्थ बनवायचे. पुढे याचेच चित्रीकरण करत त्यांनी युट्युबवर लाखो स्बस्क्रायबर्स मिळवले. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. यामागील कारण म्हणजे नुकतेच त्यांनी Lamborghini Huracan ही सुपरकार चालवली आहे.
तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली
खरंतर, राजेश त्याच्या मुलासोबत आसामला ट्रकच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे काही दिवस तिथे राहिले. या काळात ते त्याच्या मित्रांना भेटले. यावेळी त्यांच्या एका मित्राने त्याला त्याची Lamborghini Huracan कार दाखवली आणि राजेशला ती चालवण्याचा आग्रह केला. सुरुवातीला राजेश यांनी संकोच केला कारण त्यांनी अशी सुपरकार यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. त्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसण्याऐवजी पॅसेंजर सीटवर जायचे होते, परंतु कारच्या मालकाने त्याला जबरदस्तीने ड्रायव्हिंग सीटवर बसवले आणि कारचे फीचर्स समजावून सांगितले.
लॅम्बोर्गिनी Huracan ही एक हाय -परफॉर्मन्स असलेली स्पोर्ट्स कार आहे जी विशेषतः स्पीड आणि लक्झरी आवडणाऱ्यांसाठी डिझाइन केलेली आहे. यात एक पॉवरफुल 5.2-लिटर V10 इंजिन आहे, जे सुमारे 610 ते 640 bhp ची पॉवर आणि 560 ते 565 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स बसवलेला आहे, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग खूप सुरळीत होते.
Vinfast Limo Green इलेक्ट्रिक MPV भारतात येणार? सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज
ही कार स्ट्राडा, स्पोर्ट आणि कोर्सा यासह वेगवेगळ्या ड्रायव्हिंग मोडसह येते. ड्रायव्हर त्याच्या पसंती आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार हे मोड निवडू शकतो. यात लॅम्बोर्गिनीची विशेष इंटिग्रेटेड व्हेईकल डायनॅमिक्स (LDVI) सिस्टम देखील आहे, जी ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी वाढवते. सुरक्षिततेसाठी, त्यात 6 एअरबॅग्ज, ABS आणि मजबूत अलॉय व्हील्स आहेत. एकूणच, ही एक सुपरकार आहे जी स्टाइल, स्पीड आणि सुरक्षिततेचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.
ट्रक ड्रायव्हरचे जीवन दाखवणारे राजेश यांचे व्हिडिओ आज लाखो लोक पाहत आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी देखील खास आहे कारण त्याने पहिल्यांदाच सुपरकारमध्ये बसून ती स्वतः चालवली आहे.