• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Folktales Of Konkan Nrdm

कोकणातील लोककथा

आंगणेवाडीची जत्रा मागच्या आठवड्यात मोठ्या उत्साहात पार पडली. सुमारे पाच लाख भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यात आमदार, राजकीय नेते आणि कलाकार या सर्वांचीच उपस्थिती होती. मुंबईतील चाकरमानी वर्षातून तीन-चारदा आपल्या गावाला भेट देत असतात.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2023 | 06:05 AM
कोकणातील लोककथा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आंगणेवाडीची जत्रा मागच्या आठवड्यात मोठ्या उत्साहात पार पडली. सुमारे पाच लाख भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यात आमदार, राजकीय नेते आणि कलाकार या सर्वांचीच उपस्थिती होती. मुंबईतील चाकरमानी वर्षातून तीन-चारदा आपल्या गावाला भेट देत असतात. गणपती, शिमगा, गावची जत्रा आणि आंगणेवाडेची जत्रा हे ते उत्सव. मुंबईचा चाकरमानी हा जसा श्रद्धाळू आहे तसाच उत्सवप्रिय. आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या चालीरिती, परंपराना छेद देण्यास तो धजावत नाही. वाडवडिलांनी घालून दिलेली पायवाट तो निमूटपणे मळत असतो. यातून त्याची श्रद्धा तसेच लोकसंस्कृतीशी असलेली घट्ट नाळ दिसते.

आंगणेवाडीच्या भराडी देवीची पाषाणरूपी अवतरण्यामागची आख्यायिका सर्वश्रृत आहे. या आख्यायिका, लोककथा परंपरेतून मौखिक रूपाने चालत आलेल्या दिसतात. त्यातूनच आपल्याला लोकमानस, लोकरूढी, सणवार, देवदेवतांच्या उत्सवांची उकल होताना दिसते.

मालवणी भाषेचे तथा कोकणातील लोककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. सूर्यकांत आजगांवकर यांनी ‘कोकणातील लोककथा’ या ग्रंथातून कोकणातील समाजजीवन आणि संस्कृती याविषयीचा सविस्तर परिचय करून दिला आहे. श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

अरबी समुद्र व सह्याद्री यांच्या दरम्यान पसरलेला उत्तरेकडील दमणपासून दक्षिणेकडील गोव्यापर्यंतचा किनारपट्टीचा अंदाजे सत्तर ते शंभर किलोमीटर रुंदीचा आणि सातशे किलोमीटर लांबीचा प्रदेश हा प्राचीन काळापासून कोकण प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. अलिकडे मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांनी मिळून बनलेल्या प्रदेशाला ‘कोकण प्रदेश’ म्हणतात.

दक्षिण कोकणचा भाग हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यांनी मिळून दक्षिण कोकणाचा जिल्हा तयार होतो. या जिल्ह्यात बहुविध जाती-जमातीचे समाजाचे लोकसमूह राहतात. त्यांच्या देवाधर्माबद्दलच्या श्रद्धा, लोकधारणा या संदर्भात प्रचलित असलेल्या कथांचा या पुस्तकात समावेश आहे. त्यासाठी आजगावकरांनी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड, तुळस, होडावडे, कांबळेवीर, वजराठ, आडेली, वेतोरे, परुळे, उभादांडा, मोचेमाड, आसोली आरवली, शिरोडा, रेडी अणसुर, पाल आणि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे, नेमळे, कोळगाव, आकेरी सावंतवाडी, चराटे, ओटवणे, असनिये, कोनशी, बांदा, विलवडे, पडवे माजगाव, कळणे, मोरगाव, दोडामार्ग, आजगाव, आंबोली आदी ग्रामीण परिसरातील लोककथांचे संकलन केले आहे.

लोककथा या कुण्या एका कर्ताच्या नसतात. त्या परंपरेतून मौखिक रूपात चालत येतात. लोककथांच्या संकलनासाठी लेखकांनी वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील व त्या गावच्या परिसरातील दीर्घकाळ वास्तव्यास असलेला ८९ वयोवृद्ध गावकऱ्यांकडून कथा कथन करून घेतल्या आहेत. या कथांची मांडणी त्यांनी पुढील कथाप्रकारांत केली आहे. दैवतकथा, अद्भुतरम्यकथा, देवदेवता-सामर्थ्यकथा, चातुर्यकथा, इतरकथा व धनगरकथा.

बऱ्याचदा लोककथांमधून मांडले जाणारे लोकजीवन, लोकसंस्कृती यांचे स्वरूप सारखेचे असताना दिसते. उदा. देवता आपल्या प्राणप्रतिष्ठेची अपेक्षा एखाद्या भक्ताच्या स्वप्नात येऊन व्यक्त करते ते स्वप्न म्हणजे दृष्टान्त, आदेश मानून स्वप्नात पाहिलेल्या देवतेच्या मूर्तीचा (वारुळाचा) शोध घेणे आणि ती वारुळाच्या रूपात सापडल्यानंतर, त्या जागी मंदिर बांधणे इ. बाबी सर्वसाधारण गावकऱ्यांच्या मुखी असतात.

दैवतकथा या भागात एकवीस कथा आहेत. या कथांमध्ये देवतास्थानांची निर्मिती कशी झाली याविषयीचे कथन आहे. पृथ्वीतलावरील भूतगण, पिशाच्चगण, राक्षसगण यांच्यापासून सर्वसामान्यांना तसेच देवादिकांना जो त्रास दिला जात असे त्या त्रासातून त्यांना मुक्त करण्यासाठी मातोंडच्या श्रीदेवी सातेरी या ग्रामदेवतेने तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणून ‘घोडेमुख’ या शिवगणाची (सरदाराची) नेमणूक केली. वास्तव्यासाठी त्याला डोंगर दिला त्यातून श्रीघोडेमुख देवतास्थान निर्माण झाले.
श्रीभूमिकादेवी (पाल) श्रीसातेरी देवी (वेंगुर्ले) या दोन कथांमध्ये आदिमाता पार्वती वारूळरूपात प्रकटती असा लोकांचा विश्वास आहे. या दोन्ही देवता भूदवता असल्याने त्या सृष्टीसर्जनाच्या प्रतीक आहेत.

कृषिसंस्कृतीकडे वळलेल्या माणसाने बैल, गाय सर्प, कुत्रा, मांजर आदी प्राण्यांशी मित्रत्वाचे नाते जोडले. त्यामुळे त्या प्राण्यांना लोकसंस्कृतीत महत्त्व प्राप्त झाले.
देवदेवतांच्या शक्तीसामर्थ्याच्या कथांमध्ये अद्भुतरम्यता भरलेली दिसते त्याचा प्रत्यय ‘प्रताप’, ‘तेज’, ‘वामनभगत’, ‘भराडीदेवी’, ‘गुण’, ‘चमत्कार’ ‘म्हातारबाबा’ ‘बारस’ या कथांमधून येतो.

उदाहरणदाखल पुढील कथा –

वेतोबाचो चमत्कार

श्री देव वेतोबाची सन १९९६ साली पुर्नप्रतिष्ठापना झाली. त्यावेळी पूर्वीची फणसाच्या लाकडाची बनविलेली मूर्ती काढून पंचधातूची मूर्ती त्याजागी बसवण्यात आली. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार सोनवडेकर यांनी बनविली होती. सोनवडेकर यांना श्री देव वेतोबाबरोबर आपला फोटो काढावयाचा होता. श्री. सोनवडेकर गाभाऱ्यात देवाबरोबर उभे राहिले, फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी फ्लॅश मारला पण फोटो आलाच नाही म्हणून दुसऱ्यांदा फ्लॅश मारला तरीही फोटो आला नाही असे करता करता नऊ फ्लॅश मारूनही श्री. सोनवडेकरांचा देवाबरोबर फोटो आला नाही.

शेवटी, मूर्तिकार सोनवडेकर गाभाऱ्यातून बाहेर आले. त्यानंतर फोटोग्राफरने फ्लॅश मारला तेव्हा मात्र वेतोबाचा फोटो आला. प्रतिष्ठापनेच्या वेळी वेतोबाच्या कानात रुद्राक्षाच्या माळा होत्या. आत गाभाऱ्यात पंखा नव्हता की वाराही सुटला नव्हता पण कानातील रुद्राक्ष मात्र जोराने हलत होते.

श्री वेतोबाच्या पुनर्प्रतिष्ठापनेनंतर जुनी लाकडाची मूर्ती विसर्जित करण्यासाठी बाहेर नेली जात होती. संपूर्ण मूर्तीला घाम सुटला होतो. हे जमलेल्या भक्तगणांनी पाहिले होते.

लोकमानस हे अनेक प्रकारच्या श्रद्धा आणि विश्वासाने तयार झालेले असते. त्यामुळेच या देवदेवता भक्तांच्या अडीअडचणीला कधी माणूस तर कधी प्राण्यांच्या रूपात धावून येतात याची माहिती ‘टेंबकरदेव’, ‘म्हातारबाबा’, ‘कळेकाराची कृपा’ आदी लोककथांमधून मिळते.

या पुस्तकात देवदेवतांच्या चातुर्यकथांबरोबरच माणसांच्या बौद्धिक चातुर्याच्या कथाही वाचायला मिळतात. त्यात देवदेवता आणि सोमवती या देवतांच्या तर ‘प्रसाद’, ‘शेंडी’ या माणसाच्या बौद्धिक चातुर्याची प्रचिती देणाऱ्या लोककथा आहेत.

इतर काही कथा ह्या फसवणूक, धोका, फजिती, शिक्षा आदी कल्पनांवर आधारित आहेत, धनगर लोककथा ह्या धनगर समाजाच्या बोलीभाषेतील आहेत. ‘विक्रमराजा आणि सात पुत्र’ ‘राजाधुरत’, ‘इबलीकराजा’ ‘साळू महाराज’, ‘भोजराजा’ या धनगर कथांमध्ये अद्भुतता, शौर्य व रहस्यमयता आहे, धनगर समाजात मर्तिक विधीचा एक भाग म्हणून बाराव्या दिवशी ‘डहाक’ विधी केला जातो. त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ रात्र जागविण्याची प्रथा असल्याने याप्रसंगी कथा सांगितल्या जातात.

पुस्तकाच्या शेवटी लेखकांनी बोलीतील शब्द व अर्थ यांची यादी दिली आहे. यात कवनाक म्हणजे कारस्थान, चिरीपान म्हणजे देवस्थानातील विधी, पोस, पोस्त म्हणजे शिमग्याला दिलेले मांसाहारी जेवण, लेस म्हणजे रुमाल, वस म्हणजे बारापाच देवतांमधील एक असे नवीन अर्थ आपल्याला कळतात. लेखकाने कथा आणि कथनकारांची नावे परिशिष्टात जोडली आहे. विष्णू थोरे यांचे मृखपृष्ठ आकर्षक आहे व प्राचीन काळाची आठवण करून देणारे आहे. वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील या लोककथा वाचताना एक निष्कर्ष निघतोच तो म्हणजे लोककथा ह्या एकापरीने बोधकथाच असतात. यातून भक्ती, नीती, मानवता व श्रद्धा या चतु:सुत्रीचा मौलिक उपदेश केलेला दिसतो. शेवटी डॉ. सूर्यकांत आजगांवकर यांनी प्रचंड मेहनतीने केलेले लोककलांचे संकलन व त्याचा अभ्यास हा लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना व श्रद्धाळू वाचकांना मोलाचे मार्गदर्शन करणारा आहे.

– प्रा रघूनाथ शेटकर
raghunathshetkar0@gmail.com

Web Title: Folktales of konkan nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 06:05 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • kokan
  • maharashtra
  • कोकण

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
1

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
2

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!
3

Horror Story : दोन तासाच्या प्रवासात ‘तो’ माझ्यासोबत होता अन् अचानक… रक्ताने माखलेला मृतदेह!

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती
4

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; निवडणुकीच्या आधी कोंडी सोडवण्याचे आव्हान

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; निवडणुकीच्या आधी कोंडी सोडवण्याचे आव्हान

Nov 15, 2025 | 10:09 AM
India Russia Relations : भारत-रशियाची कूटनीतिक हालचाल; पुतिनच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी जयशंकर मॉस्कोला भेट देणार, कारण काय?

India Russia Relations : भारत-रशियाची कूटनीतिक हालचाल; पुतिनच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी जयशंकर मॉस्कोला भेट देणार, कारण काय?

Nov 15, 2025 | 09:59 AM
India-South Korea : $150 अब्ज ऊर्जा आयातीसाठी भारत सज्ज; कोरिया देणार आधुनिक तंत्रज्ञानाची अमूल्य साथ

India-South Korea : $150 अब्ज ऊर्जा आयातीसाठी भारत सज्ज; कोरिया देणार आधुनिक तंत्रज्ञानाची अमूल्य साथ

Nov 15, 2025 | 09:57 AM
घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष

घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष

Nov 15, 2025 | 09:52 AM
Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

Nov 15, 2025 | 09:52 AM
Surya-Budh Yuti 2025: सूर्य आणि बुधाच्या युतीने या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Surya-Budh Yuti 2025: सूर्य आणि बुधाच्या युतीने या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

Nov 15, 2025 | 09:51 AM
Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Nov 15, 2025 | 09:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.