नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! (Photo Credit - X)
मजबूत अर्थव्यवस्था आणि उत्पन्नात सुधारणा: नीलेश सुराणा (CIO)
मिरे अॅसेटचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर नीलेश सुराणा यांच्या मते, भारत नववर्ष २०२६ मध्ये अत्यंत सकारात्मक स्थितीत प्रवेश करत आहे. प्रबळ मॅक्रो इकॉनॉमिक स्थिती, विकासाभिमुख आर्थिक धोरणे आणि ७ टक्क्यांहून अधिक अपेक्षित जीडीपी (GDP) वाढीमुळे बाजारपेठेत तेजी राहण्याची आशा आहे. २०२५ मधील संथ गतीनंतर, २०२६ मध्ये कॉर्पोरेट उत्पन्नामध्ये दोन-अंकी वाढ होऊ शकते. या वाढीला मागणीतील सुधारणा, कर कपात आणि आर्थिक शिथिलतेचा मोठा आधार मिळेल. बाजारपेठेतील अस्थिरता कमी होऊन मूल्यांकन (Valuation) रास्त पातळीवर आल्याने पोर्टफोलिओला विविध क्षेत्रांत चांगल्या संधी मिळतील. विशेषतः मिड-कॅप व स्मॉल-कॅप क्षेत्रातील दर्जेदार आणि आघाडीच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
महागाईवर नियंत्रण आणि बॉण्ड मार्केटमधील संधी: बसंत बाफना (सीनियर फंड मॅनेजर)
फिक्स्ड इन्कम विभागाचे सीनियर फंड मॅनेजर बसंत बाफना यांनी सांगितले की, २०२६ मध्ये भारताची वास्तविक वाढ ७ टक्क्यांच्या पुढे असेल आणि महागाई आरबीआयच्या अपेक्षेनुसार मर्यादेत राहील. २०२५ मध्ये करण्यात आलेल्या १०० बेसिस पॉईंट्सच्या व्याजदर कपातीचे अनुकूल परिणाम २०२६ मध्ये स्पष्टपणे दिसून येतील. लिक्विडिटी (तरलता) वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पुढील तीन वर्षांसाठी बाजारात स्थिरता राहील. या पार्श्वभूमीवर, तीन वर्षांच्या मनी मार्केट आणि कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणे लक्षवेधक ठरेल. जोखीम समायोजित परतावा मिळवण्यासाठी अॅक्यूरल्स आणि उत्पन्नाशी संबंधित धोरणे फायदेशीर ठरू शकतात.
Mirae Asset चे दोन नवीन ETF बाजारात, एनर्जी आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणुकीची संधी!
इक्विटी, ईटीएफ आणि आंतरराष्ट्रीय कल: सिद्धार्थ श्रीवास्तव (प्रमुख – ईटीएफ)
ईटीएफ प्रॉडक्ट्सचे प्रमुख सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी देशांतर्गत इक्विटीजबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे. त्यांनी व्यापक बाजारासाठी मल्टी-कॅप वितरणाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये बाजारपेठेतील अस्थिरता कमी असेल. सोन्याबाबत ते आशावादी आहेत, परंतु चांदीमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारत चिनी बाजारपेठेत गुंतवणूक सुरू ठेवण्यावर आणि अमेरिकन बाजारपेठेतील एआय (AI) व संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित करेल. अमेरिकन टेक क्षेत्रातील उच्च मूल्यांकनाबाबत त्यांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे.
नावीन्यपूर्ण उत्पादने आणि जागतिक विस्तार: वैभव शाह (प्रमुख – बिझनेस स्ट्रॅटेजी)
बिझनेस स्ट्रॅटेजी आणि इंटरनॅशनल बिझनेस प्रमुख वैभव शाह यांच्या मते, २०२६ हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी उत्साहाचे असेल. कंपनी मल्टी-फॅक्टर आणि क्वॉन्ट धोरणांवर आधारित नावीन्यपूर्ण उत्पादने, तसेच हायब्रिड एसआयएफ (SIF) फंड लाँच करणार आहे. ‘गिफ्ट सिटी’मधील संधींबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या क्षेत्रातील इनबाऊंड आणि आऊटबाऊंड फंडांना जगभरातील गुंतवणूकदारांकडून ६० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २०२६ मध्ये कंपनी आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक विस्तारित करून नवीन संकल्पना आणण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी






