Adani चे सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले, 38000 कोटी रुपयांचे नुकसान; शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची भागमभाग
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दुसऱ्या दिवशीही भूकंप झाला आहे. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) अदानी समुहाचे शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 टक्केने 2030 रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्याच वेळी अदानी पोर्ट्सचे शेअर्स शुक्रवारी बीएसईमध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरून 1055.40 रुपयांवर पोहोचले. अदानी समूहाला गुरुवारी दुहेरी फटका बसला. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि इतर 7 जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच, केनियाने अदानी समूहाशी विमानतळ आणि वीज करार रद्द केले आहेत.
शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले. कंपनीचे शेअर 1020.85 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, अदानी ग्रीन सोल्युशन्स लिमिटेडचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरून 628 रुपयांवर आले आहेत. अदानी पॉवरचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांहून अधिक घसरून 445.75 रुपयांवर पोहोचले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स ३% घसरले आहेत. अदानी विल्मारच्या शेअर्समध्येही ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. दरम्यान एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स सपाट व्यवहार करत आहेत.
अदानी समूहाच्या 11 समभागांचे एकत्रित बाजार भांडवल 38000 कोटी रुपयांनी घसरून 11.68 लाख कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या 2 व्यापार सत्रांमध्ये अदानी समूहाच्या बाजार मूल्यात 2.62 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. गुरुवारीही अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स गुरुवारी 23 टक्क्यांनी घसरले. समूहातील इतर कंपन्यांचे समभागही घसरले.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 4.26 टक्क्यांच्या वाढीसह 2275 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात तो कमाल २२७६ रुपयांपर्यंत गेला.
अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. सुरुवातीच्या व्यवहारात 5.49 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 510.30 रुपयांवर व्यवहार करताना दिसला.
अदानी टोटलचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 3 टक्क्यांच्या वाढीसह 620 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.
अदानी ग्रीन एनर्जीचा समभाग कालच्या 1146.40 रुपयांच्या घसरणीसह आज 1060.05 रुपयांवर उघडला. दरम्यान सुरुवातीच्या व्यवहारात त्यात वाढ झाली आणि तो 1219.70 रुपयांवर पोहोचला. बीएसईवर सकाळी 11:34 वाजता हा शेअर 5.64 टक्क्यांच्या वाढीसह 1211 रुपयांवर व्यवहार करत होता.
अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 0.92 टक्क्यांच्या वाढीसह 1125 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. कालच्या 1114.70 रुपयांच्या बंदच्या तुलनेत हा शेअर आज 1055.40 रुपयांवर उघडला. सुरुवातीच्या व्यापारात तो 1131.90 रुपयांपर्यंत पोहोचला.
अदानी पॉवरचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 1.30 टक्क्यांच्या वाढीसह 482.35 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात तो 483.95 रुपयांपर्यंत पोहोचला.
अदानी विल्मरचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 296 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.