(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने इराणला कोणत्या प्रकारचे लष्करी उपकरणे किंवा शस्त्रास्त्रे न देण्याचे मान्य केले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी या कराराची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील वाझता तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, चीनचा हा निर्णय इराणसाठी मोठा धोकादायक मानला जात आहे. करारानुसार चीन (China) आणि इराणचे संबंध केवळ कच्चा तेलाच्या व्यापारापुरतेच मर्यादित राहणार आहेत. सध्या इराण चीनला दररोज १४ लाख बॅरल तेल निर्यात करतो, हा इराणच्या एकूण निर्यातीच्या ९०% हिस्सा आहे.
याच वेळी अमेरिकेशी व्यापारी संबंध सुधारण्यासाठी चीनने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन अमेरिकेची विमान कंपनी बोईंगकडून २०० विमाने खरेदी कराणार आहे. ट्रम्प यांनी १५० विमांनीच अपेक्षा होती. मात्र, चीनने थेट २०० विमानांची ऑर्डर दिली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
या करारामुळे अमेरिकेला मोठा प्रमाणावर फायदा होणार आहे. यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय चीनने अमेरिकेकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबातही चर्चा केली आहे.
या ऐतिहासिक करारामुळे अमेरिका(America)-चीनमधील दीर्घकाळ सुरु असलेले व्यापार युद्ध संपुष्टात येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांचा दौरा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांसाठी मोठे यश मानला जात आहे. मात्र, चीनच्या इराणला शस्त्र न पुरवण्याच्या निर्णयाने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. यावर इराण (Iran) काय प्रतिक्रिया देतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या करारानुसार, चीन इराणला कोणत्याही प्रकारचे लष्करी तंत्रज्ञान किंवा शस्त्रास्त्रे पुरवणार नाही. याउलट अमेरिकेसोबत व्यापारी संबंध सुधारण्यासाठी बोईंग कंपनीकडून २०० मोठी विमाने खरेदी करणार आहे.
Ans: अमेरिकेला मोठा प्रमाणावर फायदा होणार आहे. यामुळे अमेरिकेते रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असे म्हटले जात आहे.
Ans: सध्या चीन आणि इराणमधील व्यापार पूर्णपणे थांबवण्याची शक्यता कमी आहे. चीनने जरी शस्त्र पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला असेल, तरी दोन्ही देशांत तेल व्यापार सुरुच राहिले.






