सिनेटरचे लज्जास्पद वक्तव्य! भारतीय आणि चिलकुर बालाजी मंदिराला लक्ष्य केल्याने एच१बी व्हिसाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Chilkur Balaji Temple Visa Controversy : जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिमत्तेचा डंका वाजत असतानाच, आता अमेरिकेतून (America) एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर एरिक श्मिट यांनी एच-१बी (H1B) व्हिसा कार्यक्रमावर आणि विशेषतः भारतीय कामगारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. श्मिट यांनी केवळ धोरणात्मक टीका न करता, थेट भारतीयांच्या धार्मिक श्रद्धेशी जोडल्या गेलेल्या हैदराबादमधील प्रसिद्ध चिलकुर बालाजी मंदिराचा फोटो शेअर करून त्याची खिल्ली उडवली आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो भारतीयांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिनेटर एरिक श्मिट यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हैदराबादच्या चिलकुर बालाजी मंदिराचा फोटो टाकला. ज्या मंदिराला भारतीय लोक श्रद्धेने ‘व्हिसा बालाजी’ म्हणतात, त्या मंदिराला श्मिट यांनी उपरोधिकपणे “व्हिसा मंदिर” असे संबोधले. त्यांनी असा दावा केला की, अमेरिकेचा वर्क व्हिसा मिळवण्यासाठी हजारो लोक तिथे रांगा लावतात आणि प्रार्थना करतात. भारतीयांच्या या श्रद्धेला त्यांनी अमेरिकेच्या व्हिसा प्रणालीतील त्रुटी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे धार्मिक स्थळाला वादाच्या भोवऱ्यात ओढल्याने भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार
सिनेटर श्मिट यांचा मुख्य आरोप असा आहे की, एच-१बी आणि एल-१ सारखे व्हिसा कार्यक्रम अमेरिकन मध्यमवर्गाचे कंबरडे मोडत आहेत. त्यांच्या मते, अमेरिकन टेक कंपन्या स्थानिक तरुणांना डावलून भारतासारख्या देशातून ‘स्वस्त’ कामगार आयात करत आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला ‘व्हिसा कार्टेल’ असे नाव दिले आहे. श्मिट यांच्या दाव्यानुसार, परदेशी विद्यार्थी करदात्यांच्या पैशावर शिक्षण घेतात आणि नंतर वर्क परमिट मिळवून अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेतात. यामुळे अमेरिकेतील वेतनाचा दर कमी होत असून स्थानिक तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Programs like H-1B, L-1, F-1, and OPT are displacing U.S. workers, suppressing wages, and hollowing out our middle class. Fraud and abuse are rampant. American workers are losing, so who’s winning? Answer: The “Visa Cartel”🧵 — Senator Eric Schmitt (@SenEricSchmitt) May 13, 2026
credit – social media and Twitter
सिनेटरने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ काही आकडेवारीही मांडली आहे. त्यांच्या मते, एकूण एच-१बी व्हिसांपैकी तब्बल ७० ते ८० टक्के वाटा हा एकट्या भारताचा असतो, तर चीनचा वाटा केवळ १२ टक्के आहे. त्यांनी असा दावा केला की, अमेरिकन सरकारच्या पाठिंब्याने भारतात एआय (AI) प्रशिक्षणावर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत, ज्यामुळे अमेरिकन तरुणांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. नोकऱ्या आता केवळ गुणवत्तेवर नाही, तर ‘वशिलेबाजी’ आणि ‘नेटवर्किंग’च्या आधारावर दिल्या जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
The “Visa Cartel” has its own “Visa Temple” in Hyderabad, which sees thousands of Indians circling altars and getting passports blessed for U.S. work visas. American workers shouldn’t have to compete against a system this gamed. pic.twitter.com/k7wSlECTJ6 — Senator Eric Schmitt (@SenEricSchmitt) May 13, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blackout: ‘आमच्याकडे इंधन नाही!’ अखेर ‘या’ देशात झाले 22 तासांचे ‘महा-ब्लॅकआऊट’; ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितली हतबलता
एरिक श्मिट यांच्या या जहरी टीकेमुळे अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हिसा धोरणे अधिक कडक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ट्रम्प प्रशासन किंवा रिपब्लिकन विचारसरणीचे लोक सत्तेत आले, तर एच-१बी व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. याचा थेट फटका भारतातील टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या आयटी दिग्गज कंपन्यांना बसू शकतो. अमेरिकन सिनेटरची ही भूमिका केवळ आर्थिक नसून ती द्वेषपूर्ण असल्याचे अनेक भारतीय विश्लेषकांचे मत आहे.
Ans: त्यांनी या मंदिराला "व्हिसा मंदिर" संबोधून भारतीयांच्या व्हिसा मिळवण्याच्या श्रद्धेची खिल्ली उडवली आणि त्याचा संबंध अमेरिकन नोकऱ्या हिरावण्याशी जोडला.
Ans: आकडेवारीनुसार, एकूण एच-१बी व्हिसांपैकी ७० ते ८० टक्के व्हिसा भारतीय नागरिकांना मिळतात.
Ans: परदेशी कामगारांना कमी पगारात कामावर ठेवून स्थानिक अमेरिकन कामगारांना स्पर्धेतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला सिनेटरने 'व्हिसा कार्टेल' म्हटले आहे.






