डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनचीही भरभराट, प्रथमच ओलांडला 80,000 डॉलरचा टप्पा
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या 2024 च्या निवडणुकीचे निकाल अलीकडेच जाहीर झाले आहेत. या निकालात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प 2025 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विजयानंतर क्रिप्टो मार्केटमध्ये भरभराट सुरु झाली आहे. विशेषत: क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन या क्षणी गगनाला भिडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी, बिटकॉइनने जोरदार वाढीसह 80,000 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
हेदेखील वाचा- एअर इंडिया-विस्ताराच्या विलीनकरणापूर्वी सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा; वाचा… काय आहे घोषणा?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासह बिटकॉइनमध्ये देखील तेजी अनुभवायला मिळत आहे. बिटकॉइन, जगातील सर्वात मान्यताप्राप्त क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनची किंमत जानेवारी 2023 मधील 38505 डॉलरच्या नीचांकावरून दुप्पट झाली आहे. आशियाई कालखंडानुसार, 11 नोव्हेंबर रोजी बिटकॉइन 81464 डॉलरच्या पातळीवर ट्रेडिंग करताना दिसले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
खरं तर, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे क्रिप्टोकरन्सीच्या प्रचाराचे समर्थक म्हणूनही पाहिले जाते. अशी अपेक्षा आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, क्रिप्टोकरन्सीच्या नियमनाशी संबंधित अडथळे आणि आव्हाने अधिक सुलभ होतील. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सतत तेजी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतरच बिटकॉइनने 80,000 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच बिटकॉइनची अधिक भरभराट होईल, अशी सर्वांना आशा आहे.
यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान, क्रिप्टोकरन्सी उद्योगाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आहेत. डेटानुसार, यूएस काँग्रेसमध्ये क्रिप्टोच्या बाजूने असलेल्या उमेदवारांवर एकूण 119 डॉलर दशलक्ष खर्च केले गेले आहेत.
हेदेखील वाचा- ‘हा’ शेअर 6 ते 9 महिन्यांत 340 रुपयांवर जाण्याची शक्यता; राष्ट्रपतींकडेही आहेत 373 कोटी शेअर्स!
क्रिप्टोकरन्सी उद्योगाला आशा आहे की या मोठ्या खर्चानंतर, क्रिप्टोकरन्सीला डिजिटल मालमत्ता म्हणून प्रोत्साहन दिले जाईल आणि क्रिप्टोकरन्सी वापरण्यास सुलभ करण्यासाठी अनेक कायदे केले जातील अशी आशा आहे.
गेल्या बुधवारी, जेव्हा अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची मतमोजणी आणि मतदान होत होते, तेव्हा बिटकॉइनने 75,000 डॉलरची पातळी ओलांडली होती, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये, बिटकॉइनने 63,14,109.26 रुपयांचा आकडा गाठला होता. याआधी, बिटकॉइनची मागील उच्च पातळी 73750 डॉलर होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून रिपब्लिकन पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या या विजयानंतर क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मालमत्तांमध्ये तेजी पाहायला मिळाली.
गुरुवारी, अमेरिकेचे एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्यावर बिटकॉइनचा व्यापार होतो त्यात लक्षणीय वाढ दिसून आली. याच वर्षात म्हणजेच 2024 मध्ये बिटकॉइनच्या किमतीत जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) कडून जोरदार मागणी आणि यूएस फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात सतत कपात केल्यानंतर, बिटकॉइनचा दर सतत वाढीच्या मार्गावर आहे.