अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्प (Budget 2023-24) सादर करण्यात आलं आहे. अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये (Share Market) सकारात्मक चित्र बघायला मिळाले. अदानी समूहावर झालेल्या आरोपामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मरगळ आली होती. आज बुधवारी सकाळपासूनच बाजारात तेजी पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स थोड्यावेळापूर्वी 60 हजारांच्या वर गेला. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळालेली आहे. निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या 10 मिनिटांमध्ये 600 अंकांनी सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळाली.
[read_also content=”माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले..“उद्धव ठाकरे नामर्द” https://www.navarashtra.com/maharashtra/nitesh-rane-criticized-on-ex-chif-minister-udhhav-thackeray-nrps-366283.html”]
निफ्टी देखील एक टक्क्याने वाढला आहे. सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये 138 अंकाची वाढ दिसली आहे. सध्या निफ्टी 17,801 वर पोहोचला आहे. सर्वच सेक्टरच्या शेअर्ससमोर आज हिरवा रंग दिसत आहे. सकाळी 11.30 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या भाषणात भांडवली गुंतवणूक 33 टक्के वाढून 10 लाख कोटी झाल्याचे सांगितले. जीडीपीच्या एकूण 3.3 टक्के एवढी ही गुंतवणूक आहे.
2013 पासूनचा मार्केट ट्रेंड पाहिला तर लक्षात येथे की मागच्या 10 पूर्ण अर्थसंकल्पातून (निवडणुकांच्या वर्षातले अर्थसंकल्प अर्धे असतात) सहा वेळा सेन्सेक्समध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. तर सहा वेळा सेन्सेक्स कोसळला होता. 2020 मध्ये सेन्सेक्समध्ये 2.4 टक्क्यांची घसरण झाली होती.