देशाचा अर्थसंकलप नेमका कोण तयार करते? 'ही' आहे यंदाची संपूर्ण टीम... ज्यांनी दिलंय मोलाचं योगदान!
मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील (Modi 3.0) पहिला अर्थसंकलप सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण अर्थसंकलप (Budget) असणार आहे. मात्र, आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की देशाचा अर्थसंकलप नेमका कोण तयार करते? अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीममध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश असतो? असे प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडलाच असेल याच पार्श्वभूमीवर आज आपण अर्थसंकल्प तयार करणाऱ्या टीमबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत? नेमका देशाचा अर्थसंकल्प कोण तयार करते? हे जाणून घेणार आहोत…
निर्मला सीतारामन, टीवी सोमनाथन प्रमुख चेहरे
निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा देशाच्या अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहे. तर त्या २३ जुलै रोजी देशाचा सलग सातव्यांदा अर्थसंकलप सादर करणार आहे. अर्थात अर्थमंत्री असल्याने त्या देशाच्या अर्थसंकलप सादर करणाऱ्या टीमचा प्रमुख चेहरा आहेत. याशिवाय टीवी सोमनाथन हे देखील केंद्रीयअर्थसंकल्प सादर करणाऱ्या टीमचा आणखी महत्वाचा चेहरा आहे. टीवी सोमनाथन हे अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव आहेत.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ हॅन्डल)
अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी ‘या’ असतील तरतुदी; वेटिंग तिकीट, सुरक्षित प्रवासाचा प्रश्न सुटणार?
अजय सेठ यांचाही समावेश
टीवी सोमनाथन हे वित्त सचिव तसेच खर्च विभागाचे काम ते पाहतात. त्यांनी 2015 ते 2017 या कालावधीमध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे अगदी जवळचे मानले जातात. याआधीही त्यांनी अनेक अर्थसंकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय या बजेट टीममध्ये 1987 चे आयएएस अधिकारी अजय सेठ यांचाही समावेश आहे. ते वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. भारताचा पहिला हरित सार्वभौम ग्रीन ब्रँड आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तुहिन कांत पांडे, संजय मल्होत्रा
तुहिन कांत पांडे यांची देखील देशाचा आर्थिक वर्ष 2024 चा संपूर्ण अर्थसंकलप बनवण्यात महत्वाचे योगदान आहे. सध्या ते गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. एअर इंडियाच्या विक्रीत आणि एलआयसीच्या आयपीओमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर संजय मल्होत्रा सध्या महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत. यावेळीचा अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ते 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पात मिळणार ‘मोठे गिफ्ट’? सरकारकडून होणार ‘ही’ घोषणा!
विवेक जोशी, व्ही अनंत नागेश्वरन
यंदाचा अर्थसंकल तया करण्यात विवेक जोशी यांनी देखील आपला मोलाचा वाटा उचलला आहे. वर्ष 2022 मध्ये अर्थ मंत्रालयात काम करण्यास सुरुवात केली. सध्या ते आर्थिक सेवा विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बँकिंग, विमा आणि पेन्शनशी संबंधित नियमांवर काम केले आहे. व्ही अनंत नागेश्वरन हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. त्यांचा देखील यंदाचा संपूर्ण अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. विशेष म्हणजे जी-20 शिखर परिषद यशस्वी करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.