'हे' आहे श्रीमंतांचे गाव... चहा पावडर, दुध आणायलाही लोक जातात विमानाने; वाचा... सविस्तर!
घराबाहेर कार आणि बाईक पार्क करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. एखाद्याच्या घराबाहेर, कार जितकी महाग तितकेच एखाद्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन केले जाते. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबाबत सांगणार आहोत. त्या गावात प्रत्येक घरासमोर कार किंवा बाइकसाठी नाही तर विमानांसाठी पार्किंगची जागा आहे. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खाजगी जेट असलेल्या या गावात चहासाठी दूध आणि चहाची पाने घेण्यासाठी लोक आपल्या जेटने जातात. कुटुंबासमवेत लंच किंवा डिनरला जायचे असले तरी लोक आपल्या प्रायव्हेट जेटचाच वापर करतात.
कॅमेरॉन एअर पार्क गाव विमान वाहतुकीसाठी खास गाव
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील कॅमेरॉन एअर पार्क गाव हे विमान वाहतुकीसाठी एक अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खासगी जेट आहे. गावात सुमारे 124 घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खासगी जेट पार्क केलेले असते. जर तुम्ही विचार करत असाल की गावातील लोक इतके श्रीमंत आहेत की, ते कार किंवा बाईक ऐवजी जेटचा वापर करतात. तर तसे नाहीये… यामागे वेगळेच कारण आहे.
(फोटो सौजन्य : सोशल मीडीया)
काय आहे पार्श्वभुमी
कॅमेरॉन एअर पार्क या गावाची स्थापना १९६३ साली झाली. खरे तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांची सोय करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खासगी जेट आहे.
छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कॅमेरॉन एअर पार्क या गावातील बहुतेक लोक निवृत्त वैमानिक आहेत. त्यामुळे ते स्वतःची विमाने देखील उडवतात. हे एअरफील्ड असल्याने रस्तेही अशाच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. जिथून विमाने उडवता येतात. लोकांच्या घरात गॅरेजऐवजी हँगर्स आहेत. येथील रुंद रस्ते धावपट्टीसारखे काम करतात. कॅमेरून एअर पार्कच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले साइन बोर्ड आणि लेटर बॉक्सही खाली उतरवण्यात आले आहेत. जेणेकरून विमान उड्डाण करताना कोणतीही अडचण येऊ नये. या गावाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली विमाने सर्वच आश्चर्यचकित होत आहे.