सोमवारी खुला होणार 'हा' तगडा आयपीओ; 1310 रुपये असेल किंमत, वाचा... सविस्तर!
निवासी क्षेत्रातील सर्वात मोठे डेव्हलपर म्हणून कॅसग्रँड प्रीमियर बिल्डर लिमिटेडची ओळख आहे. चेन्नईस्थित (तामिळनाडू) या सुप्रसिद्ध निवासी ब्रँडने आयपीओच्या माध्यमातून 1,100 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या बाजार नियामक संस्थेकडे आपला प्राथमिक प्रस्ताव अर्थात रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मसुदा दाखल केला आहे.
१,००० कोटींचे नवीन शेअर्स असणार
प्रति इक्विटी शेअरचे २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या आयपीओत १,००० कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि समभागधारक कंपनी प्रवर्तकांकडून १०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री यांचा एकत्रित समावेश आहे. समभाग विक्री ऑफरमध्ये अरुण एमएन आणि कॅसाग्रँड लक्सर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून प्रत्येकी 50 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची विक्री समाविष्ट करण्यात आलेली आहे.
कुठे वापरली जाणार आयपीओची रक्कम
या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या निधीपैकी 150 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीने घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जाच्या पूर्ण किंवा अंशत: मुदतपूर्व परतफेड किंवा परतफेडीसाठी वापरली जाणार आहे. तर सीजी मॅजिक, सीजी सिव्हिल इंजिनीअरिंग, सीजी गार्डन सिटी, सीजी माइलस्टोन, सीजी ग्रेस, सीजी होरायझन्स, सीजी स्मार्ट व्हॅल्यू होम्स, सीजी बिझपार्क, सीजी एव्हर्टा, सीजी हायडरवाईज, सीजी लोटस, सीजी झिंगो या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या तसेच सीजी अँकर आणि डॅन्यूब होम्स या पूर्ण मालकीच्या स्टेप-डाउन उपकंपन्या यांनी घेतलेल्या सर्व किंवा अपवादात्मक कर्जाची पूर्ण किंवा अंशत: मुदतपूर्व परतफेड किंवा परतफेड करण्यासाठी तसेच सामान्य कंपनी कामकाजासाठी 650 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. त्यासाठी हा निधी अशा पूर्ण मालकीच्या सहाय्यक/स्टेप-डाउन उपकंपन्यांमध्ये गुंतविला जाणार आहे.
हे देखील वाचा – शेअर बाजारात लवकरच येणार हा तगडा आयपीओ, गुंतवणूकदारांनो… पैसे तयार ठेवा!
कुठे आहे कंपनीचा विस्तार
कॅसग्रँडने बेंगळुरू (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा) आणि कोईम्बतूर (तामिळनाडू) यासारख्या दक्षिण भारतातील शहरांमध्ये देखील आपले कार्य विस्तारले आहे. 31 मे 2024 पर्यंत कंपनीने 21.45 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्रफळ असलेले 101 प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच 33.60 दशलक्ष चौरस फूट विस्तार असलेल्या 42 प्रकल्पांवर कंपनी सध्या काम करत आहे. कंपनीकडे अंदाजे 13.15 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्रासह 17 प्रकल्पांची योजना आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 7.24 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्राच्या पूर्व-विक्रीचा टप्पा गाठला आहे.
कशी आहे कंपनीची आर्थिक परिस्थिती
कॅसग्रँड मियरचा महसूल २०२२ मध्ये १८७६.८२ कोटी रुपये होता आणि तो १८.०२ टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढून २०२४ मध्ये २६१३.९९ कोटी रुपयांवर झेपावला आहे. तसेच करोत्तर नफा २०२२ मध्ये १४६.०८ रुपये होता. तो ३२.६३ टक्क्यांनी वाढून २५६.९५ कोटी रुपयांवर झेपावला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)