फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Dhoot Transmission IPO : ऑटो कॉम्पोनेंट बनवणारी कंपनी आणि बेन कॅपिटल समर्थित कंपनी Dhoot Transmission 1400 कोटींचा आयपीओ घेऊन येत आहे. या संदर्भात, कंपनीने सेबी (SEBI) कडे आपले अपडेटेड ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. यापूर्वी, कंपनीला ५ मे २०२६ रोजी गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने सेबीकडून आधीच मंजुरी मिळाली होती. मेनबोर्ड सेगमेंटमधील या आयपीओनंतर, कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजवर लिस्टिंग केले जातील.
आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?
या Public Issue मध्ये नवीन शेअर्स सोबत जुन्या शेअर्सची विक्री म्हणजेच OFS (Offer for Sale – OFS) यांचाही समावेश असणार आहे. यात कंपनी 1400 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करेल. तर दुसरीकडे OFS विंडोच्या मदतीने त्यांच्याकडील शेअर्शमधून १.६३ कोटींपर्यंतचे इक्विटी समभाग विकतील. या OFS चाच एक भाग म्हणून, अमेरिकेतील ‘बेन कॅपिटल’ (Bain Capital) आपली संलग्न संस्था ‘BC Asia Investments XV Ltd’ च्या माध्यमातून सुमारे १.३२ कोटी इक्विटी शेअर्स विकेल; तर ‘मंगलम कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड’ जी पूर्वी ‘मंगलम कॉईल्स प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून ओळखली जात असे त्या कंपनीचे ३१.१८ लाख शेअर्स विकेल.
कंपनीने ‘फ्रेश इश्यू’द्वारे म्हणजेच नव्या शेअर्सच्या विक्रीतून उभारलेल्या निधीपैकी सुमारे ₹४९३.९ कोटींची रक्कम, आपल्यावरील जुनं कर्ज फेडण्यासाठी वापरण्याचं नियोजन करेल. या निधीपैकी ₹२७२.५८ कोटींची रक्कम ‘धूत ऑटो-कम्पोनेंट्स’ आणि ‘धूत यूके’ यांसारख्या कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवली जाईल. याव्यतिरिक्त, झज्जर (हरियाणा) आणि शूलगिरी (तमिळनाडू) येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ₹१५० कोटींचा वापर केला जाईल.
१९९९ मध्ये स्थापन झालेली ‘धूत ट्रान्समिशन’ ही कंपनी ‘वायरिंग हार्नेस’चे उत्पादन आणि पुरवठा करते. या हार्नेसमध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स व कंट्रोलर्स, स्विचेस, टर्मिनल्स, कनेक्टर्स, जंक्शन बॉक्सेस, उच्च-दाबाच्या इंटरकनेक्शन प्रणाली आणि डेटा केबल्स यांचा समावेश असतो; आणि विविध प्लॅटफॉर्म्ससाठी वाहन प्रकारांसाठी एप्लिकेशन-स्पेसिफिक आर्किटेक्चर पुरवल्या जातात.
देशातील दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या वायरिंग हार्नेस बाजारपेठेत, आपण अव्वल दोन कंपन्यांपैकी एक असल्याचा दावा ही कंपनी करते. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा ४४.६४% इतका होता. ‘बजाज ऑटो’, ‘टीव्हीएस मोटर कंपनी’, ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ आणि ‘रॉयल एनफील्ड’ यांसारख्या नामांकित कंपनी ह्या या कंपनीचे ग्राहक आहेत.
(येथे दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. एक गुंतवणूकदार म्हणून, आपले पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. Navrashtra.com कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.)






