बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम भारतीय व्यापारावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार सध्याच्या घडीला पूर्णतः थांबला आहे. भारतीय निर्यातदारांना आशा आहे की बांगलादेशातील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. ज्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार पुन्हा सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र, बांग्लादेशमध्ये सध्या केवळ राजकीय संकट नसून, बांगलादेश आर्थिक गर्तेत देखील सापडला आहे. ज्यामुळे भारतीय वस्तूंची निर्यात आणखी काही काळ प्रभावित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर सैन्याचा खडा पहारा
भारतातून बांग्लादेशला दररोज ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे पाठवली जातात. मात्र, बांगलादेशात सोमवारी घडलेल्या घडामोडींनंतर आज बांगलादेश सीमेपलीकडून या मालाची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांसह नाशवंत माल सीमा ओलांडण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे हा माल भारतीय सीमेच्या आतच आतच असून, भारतीय सैन्य भारत-बांगलादेश सीमेवर खडा पहारा देत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!
निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता
परिणामी, आता सीमेवर अडकून पडलेला हा माल लवकरात लवकर बांगलादेशात पोहोचला नाही तर निर्यातदारांचे मोठे नुकसान होऊ शकते. भारतातून बांगलादेशात निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये फळे, भाज्या, कॉफी, चहा, मसाले, साखर, मिठाई, रिफाइंड पेट्रोलियम तेल यांचा समावेश होतो. रसायने, कापूस, लोखंड, पोलाद याशिवाय वाहनांचाही समावेश आहे. याउलट आता बांगलादेशातून भारतात मासे, प्लास्टिक, चामडे आणि कपडे आयात केले जातात. हा व्यापार देखील प्रभावित होणार आहे.
बांगलादेशात परकीय चलनाचा तुटवडा
बांगलादेश गेल्या काही काळापासून परकीय चलनाच्या कमतरतेचा सामना करत आहे. अर्थात बांग्लादेशात आधीच डॉलरची कमतरता आहे. ज्यामुळे बांग्लादेशच्या आयात व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. भारतासह काही देशांकडून बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीत अलीकडील एक-दोन वर्षात घट झाली आहे. अशातच आता बांगलादेशात राजकीय अस्थिरतता निर्माण झाली आहे. ज्याचा दुहेरी परिणाम हा येत्या काळात भारतातून बांग्लादेशला होणाऱ्या निर्यातीवर होण्याची शक्यता होत आहे.
हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?
गेल्या काही वर्षात निर्यातीत घट
बांग्लादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्ये बांग्लादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-२४ मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-२३ मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में ये 14.1 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली आहे. अर्थात मागील दोन ते तीन वर्षात भारतातून बांग्लादेशला होणाऱ्या निर्यातीत उत्तरोत्तर घट झाली आहे.