पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्था बळकट होईल (फोटो- संसद टीव्ही/यूट्यूब)
Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. या बजेटमधून सर्व सामान्य आणि प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश बळकट होईल असे म्हटले आहे. उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाइल, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पाचे वाचन करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘विकासदर वाढवणे, खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे तसेच मध्यमवर्गीय वर्गाला ताकद देणे यावर सरकारचा भर असणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये विकासाच्या संधी निर्माण करणे, तसेच सरकारचे लक्ष हे आरोग्य आणि रोजगारावर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल.’
शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. मखाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्रीनी सांगितले आहे. कापूस उत्पदनावर सुद्धा विशेष लक्ष देणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना एआय (AI) बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. एआयच्या शिक्षणासाठी 500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. ३ एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन करणार केले जाणार आहेत.
उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देऊन पुरवठा करणार अशा महत्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना लाख मोलाचं गिफ्ट
करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे. शेतकऱ्यांन विनाक्रडीट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मध्यमवर्गीयांना मिळणार का ‘Income Tax’ मधून दिलासा
आयकरमधून दिलासा देण्यासाठी टॅक्सअंतर्गत काही मोठे आणि महत्वाचे बदल केले जाऊ शकते. असे बदल केले गेल्यास लोकांवरील कराचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. आयकरमध्ये बदल का केले जाऊ शकतात असा विचार केल्यास मध्यमवर्गातील लोकांकडे रोख रक्कम असण्याचे व रोख रकमेने व्यवहार करण्याचे प्रमाण असल्याने ते वाढत्या महागाईला तोंड देऊ शकतात. मध्यमवर्गीय वर्गामुळे ग्राहक बाजारपेठेत वृद्धी येऊ शकते. यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होऊ शकते.






