HDFC आणि SBI च्या लाखो खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; मुदत ठेवींवरील व्याजात झालीये इतकी वाढ!
काही दिवसांपूर्वी अधिकच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्समुळे (एनपीए) त्रस्त असलेल्या भारतीय बँका सध्या जगभरातील बँकांना टक्कर देत आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस 17 टक्क्यांनी वाढले आहे. इतकेच नाही तर बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 154.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. ज्यामुळे एचडीएफसी बँक ही आता जगातील पहिल्या 10 बँकांमध्ये क्रमांक पटकवण्यात यशस्वी झाली आहे. बँकेने टॉप-१० जगातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत दहावे स्थान मिळवले आहे.
13 व्या क्रमांकावरून दहाव्या स्थानी झेप
HDFC बँकेसोबतच भारतातील आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँका देखील जागतिक बँकांना टक्कर देत आहेत. HDFC बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वाधिक कर्ज वाटणाऱ्या बँका आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही बँकांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या जून महिन्याच्या अखेरीस वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे गेल्या काळापासून तिन्ही बँकांनी जागतिक मानांकनात उत्तरोत्तर वाढ नोंदवली आहे. एचडीएफसी बँकेने १३ व्या क्रमांकावरून दहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
ICICI 18 व्या तर SBI 21 व्या स्थानी
जून तिमाहीच्या अखेरीस ICICI बँकेचे बाजार मूल्य 11.5 टक्क्यांनी वाढून 102.7 अब्ज डॉलर इतके झाले आहे. यासह आयसीआयसीआय बँक जगातील टॉप 25 जागतिक बँकांमध्ये 18 व्या क्रमांकावर पोहचली आहे. यापूर्वी कॅनडातील टीडी बँक मार्च तिमाहीत 18 व्या स्थानावर होती. तर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचे मार्केट कॅप देखील 11.9 टक्क्यांनी वाढून 90.1 अब्ज डॉलर झाले आहे. यासहा एसबीआय बँकेने जागतिक क्रमवारीत २१ वे स्थान पटकावले आहे.