आता पाणी होणार अधिकच शुद्ध ! livpure ने मेन्टेनन्स फ्री वॉटर प्युरिफायर्सची रेंज केली लाँच
नवीन स्टॅंडर्ड स्थापन करत, ग्राहकांसाठी मेन्टेनन्स फ्री पाण्याच्या शुद्धतेचा अनुभव आणण्यासाठी, भारतातील आघाडीचा व ग्राहक-केंद्रित ब्रँड लिव्हप्युअने मेंटेनन्स फ्री वॉटर प्युरिफायर्सची सर्वात मोठी रेंज बाजारात ऑफर केली आहे. ग्राहकांच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे वॉटर प्युरिफायर्ससाठी दरवर्षी सरासरी ५,००० पर्यंत होणारा मेंटेनन्स कॉस्ट. हाच खर्च पूर्णपणे दूर करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही रेंज सादर केली असून, वॉटर प्युरिफिकेशन क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा कंपनीचा मानस आहे.
याचाच एक भाग म्हणून लिव्हप्युअरने त्यांच्या लोकप्रिय ‘हाथी मत पालो’ या टीव्हीसी कॅम्पेनचे पुनरागमन केले आहे. ही मोहीम यावर्षी आयपीएल दरम्यान तसेच विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅनेल्सवर प्रसारित केली जाणार आहे. या कॅम्पेनमध्ये, मेंटेनन्सच्या जड आणि खर्चिक प्रक्रियेला बाजूला सारत, कंपनीचे नव्याने लाँच झालेले मेंटेनन्स फ्री प्युरिफायर्स यांचा प्रचार करण्यात येईल.
2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल
या नव्या उपक्रमांतर्गत, अलुरा, अलुरा प्रीमिया, सेरेनो, एटर्ना आणि एटर्ना प्रीमिया हे प्रीमियम वॉटर प्युरिफायर्स जवळपास ३० महिन्यांच्या इंटीग्रेटेड मेंटेनन्स सर्व्हिसेससह सादर करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना दीर्घकाळपर्यंत कोणताही अतिरिक्त देखभाल खर्च न करता शुद्ध पाणी मिळणार आहे, जे मालकीहक्काच्या अनुभवाला विनासायास व परिपूर्णतेकडे नेत आहे.
लिव्हप्युअर भारतात एम्बेडेड सर्व्हिसेस सादर करणारा पहिला ब्रँड ठरला आहे. कंपनीने यामार्गे ग्राहकांसाठी विश्वासार्हता, सोय आणि आर्थिक सुसंगतता यांचे नवे परिमाण तयार केले आहे. 60% मार्केट शेअर मिळवण्याच्या उद्देशाने कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांचे संपूर्ण मिश्रण देत आहे. या माध्यमातून भारतात शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेला आणि वॉटर प्युरिफिकेशन उद्योगाला नवे परिमाण प्राप्त होत आहे.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले, “आम्ही ग्राहकांचा अनुभव अधिक सोयीस्कर व समाधानी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही इंटीग्रेटेड सर्व्हिस म्हणजे केवळ एक वैशिष्ट्य नसून दीर्घकालीन मूल्य आणि मनःशांतीचे आश्वासन आहे.”
ग्राहक आता त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी विनासायास उपायांना प्राधान्य देत आहेत. याच पार्श्वभूमीवर, लिव्हप्युअरचा हा उपक्रम उद्योगातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, जो वॉटर प्युरिफायर मालकीहक्काला अधिक सुलभ, किफायतशीर आणि प्रगत बनवतो.